*इंदापूर*:- (दि.११) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात (दि.११) शुक्रवारी रोजी नवरात्रीनिमित्त दांडीयाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्या अनिता साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या मदतीने गरबा दांडियाचा सोहळा उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी गरबा व दांडिया नृत्याचा मनमुराद आनंद घेतला.
दिवंगत रत्नाकर मखरे तात्यांची शिक्षण संस्था ही अभ्यासाबरोबरच संस्कृतीचा ठेवा असणारी, जपणारी व संस्कार जोपासण्याचा अविरत प्रयत्न करणारी म्हणून तिचा नावलौकिक आहे. संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना भारतीय सण, संस्कृती, परंपरांची माहिती व्हावी यासाठी शैक्षणिक संकुलात संस्थाप्रमुख शकुंतला मखरे( काकी) यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक नेहमीच वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.असे सचिव ॲड. समीर मखरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतेवेळी म्हणाले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दांडियाच्या मनमुराद आनंद घेतला.
टिप्पण्या