*दसऱ्या निमित्त वृक्ष संजीवनी* *परिवाराकडून आरोग्यदायी ,जीवनदायी शुभ असणाऱ्या शमी व आपटा (सोने) या झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम .*
इंदापूर:- शुक्रवार दि . १ १ आक्टों २०२४ आपल्या भारतीय संस्कृती मधे खूप महत्व असलेला मोठा सण . हा अश्विन शुद्ध दशमीला येतो अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसा पासून नऊ दिवस नवरात्र असतो त्यानंतरचा दहावा दिवस म्हणजेच दसरा . म्हणूनच " दसरा सण मोठा ,नाही आनंदाला तोटा या काव्यातच याची महती गौरवलेली आहे . याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता .
या दिवशी पांडवांनी आपली वस्त्रे आणि शस्त्रे शमी या झाडावर वनवासाला जाताना लपवून ठेवली होती व वनवास संपल्या नंतर ती आजच्या दिवशीच या झाडा वरून आपली शस्त्रे व वस्त्रे घेतली व झाडाची पुजा केली . निसर्गा मधे जी काही आरोग्यदायी पवित्र वृक्ष आहेत त्यामधे या शमी व सोने (आपटा) या झाडांना खूप महत्व आहे .
म्हणून आज शुक्रवार दिनांक ११ आक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या पुर्व संधेला दसऱ्याच्या पुर्वसंधेला दसऱ्या निमित्त वृक्ष संजीवनी परिवार तर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळ , जोतीबा मंदिर , तुळजाभवानी माता मंदिर व लक्ष्मी माता मंदिर परिसरात शमी व सोने (आपटा ) या पवित्र अशा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . त्यानंतर वृक्ष संजीवनी परिवाराने सायंकाळी भवानी मातेचे दर्शन घेऊन शहरातील नागरिकांना आरोग्य व सुख समृद्धी मिळावी म्हणून प्रार्थना केली . यावेळी वृक्ष संजीवनी परिवाराच्या सायराभाभी आत्तार , भागवत घनवट , अशोक अनपट , धरमचंद लोढा , बाळासाहेब क्षीरसागर , अशोक चिंचकर, हमीदभाई आत्तार , प्रशांत शिताप प्रा . कृष्णा ताटे महादेव चव्हाण इ . उपस्थित होते .
टिप्पण्या