इंदापूर:- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये सिनियर के .जी सी.बी.एस.ई. च्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक 28/0 3 /2024 रोजी ग्रॅज्युएशन डे आयोजित करण्यात आला . प्रशालेतील मान्यवरांनी विद्येची आराध्य देवता असणारी सरस्वतीचे प्रतिमा पूजन केले. प्रशालेतील छोट्या बालचमुंनी आजच्या धावत्या युगामध्ये मोबाईलचा वाढता वापर व त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम कसा होतो, हे एका छोट्या नाटिकेद्वारे सादर केले. त्याबरोबरच आपल्या बोबड्या भाषेत मनोगत व्यक्त केले .आकर्षक नेत्र दीपक नृत्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले.हसत खेळत पूर्व प्राथमिक शिक्षणातून खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षणाच्या पायरी वाटचाल करण्यास हे बालचमु सज्ज झाले. विद्यार्थी ,लहान मुले हे अनुकरणप्रिय असतात ;ते थोर व्यक्तींचे ,मोठ्यांचं अनुकरण करून त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतात ,मग त्यांच्यासमोर थोरामोठ्यांनी एक चांगले आदर्शवत वर्तन करून ,त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण करावा जेणेकरून आजचा हा छोटा बालक ...
SHIVSRUSTHI NEWS