इंदापूर,
दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रकिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी केले.

तहसील कार्यालय येथे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी सचिन खुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. पांढरे म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे पालन करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनातर्फे निवडणुकीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असून निवडणुका पारदर्शकपणे व शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्याची माहिती श्री. पांढरे यांनी दिली.
टिप्पण्या