विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज चे मोठे यश- महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याची संधी
इंदापूर,:- विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अंतर्गत विविध कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेचे वर्ग देखील चालू करण्यात आले आहेत.
कॅम्पस ड्राईव्ह घेण्याकरिता पुणे जिल्हयातील नावाजलेल्या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या कंपन्यांनी घेतलेल्या मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.
भारत फोर्ज लिमिटेड पुणे मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागामधून प्रतीक्षा खारतोडे आणि इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन या विभागामधून किरण हिवरे, तेजस्विनी खराडे, कुणाल गायकवाड, जयदीप शिंदे, सोहम घाडगे, शुभम गाडे यांचा समावेश आहे. कड देशमुख बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सिविल विभागातून प्रताप सुर्वे व प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. केएसबी पंप या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागातून पृथ्वीराज झिटे व गणेश थोरात यांचा समावेश आहे. कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऑटोमोबाईल विभागामधून आदित्य लांबरुड, इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन या विभागामधून औदुंबर चोरमले, विजय गावडे, जयदीप शिंदे व मेकॅनिकल विभागातून प्रतीक्षा खारतोडे यांचा समावेश आहे. एल अँड टी डिफेन्स पुणे या कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकमुनिकेशन या विभागातील जयदीप शिंदे, कुणाल गायकवाड, ओमकार नाईक नवरे, सोहम घाडगे, तेजस्विनी कारंडे व करण बोराटे यांचा समावेश आहे तसेच मेकॅनिकल विभागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणेश थोरात, पृथ्वीराज झिटे, रणजीत मेहेर, रोहन चव्हाण, रोहित बर्डे, रोहित खरतोडे, वृषाली खरतोडे यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजूनही अनेक कंपन्या महाविद्यालयाला भेट देऊन महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थ्यांचे निवड करण्यासाठी इच्छुक आहेत. कंपनीची गरज ओळखून कंपनीला आवश्यक असणारे सक्षम मनुष्यबळ तयार करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करत असून यासाठी आवश्यक असणारे स्किल बेस्ड एज्युकेशन देण्यावरती महाविद्यालयाचा भर आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी केले.
या व्यतिरिक्त महाविद्यालयाने डिप्लोमा इंजीनियरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी या देशांमध्ये असलेल्या संधी ओळखून विद्यार्थ्यांकरिता, जर्मनी या देशांमध्ये ड्युअल डिग्री करता यावे यासाठी आवश्यक असणारे जर्मनी भाषेचे क्लासेस चालू केलेले आहेत. जर्मनी भाषेचे ज्ञान घेतल्यानंतर जर्मनीमध्ये उच्च शिक्षणास जाण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण माहिती विद्यार्थी व पालक यांना मिळावी यासाठी महाविद्यालयातून येत्या १५ मार्च २०२४ रोजी माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाविद्यालयातील नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यास महाविद्यालय प्रयनशील आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये उत्तम संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असल्याचे महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक योगेश जाधव यांनी सांगितले.
अंतिम परीक्षेचा निकाल हाती येणे अगोदरच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व पालकांनी यासंदर्भात समाधान व्यक्त केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी अभिनंदन केले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● शिवसृष्टी न्युज वरील कृपया बातमी कोणीच काॅपी करू नये त्यावर काॅपीराईट कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल-संपादक धनंजय कळमकर पाटील
टिप्पण्या