मुख्य सामग्रीवर वगळा

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी बंटी सोनवणे*

इंदापूर:- येथील डॉ.आंबेडकर नगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे २०२४-२५ या वार्षिक कालावधी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कार्यकारिणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते बुद्धांच्या मुर्तीला पुष्प तर डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर शहर अध्यक्ष पदी सामाजिक युवक कार्यकर्ते बंटी सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा आरपीआयचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रा.अशोक मखरे, जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मखरे, हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, पुणे जिल्हा आरपीआयचे चिटणीस संदिपान कडवळे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुहास मोरे, अनिल साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जयंती महोत्सव सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले.
    नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष बंटी सोनवणे, उपाध्यक्ष अजय मखरे, नितीन मखरे, खजिनदार प्रशांत मखरे, सह खजिनदार आशिश गायकवाड, सचिव सिध्दांत खरे, सह सचिव रजनीकांत लोंढे, कार्याध्यक्ष सुमित मखरे, सह कार्याध्यक्ष दिपक चव्हाण इत्यादी.
     बैठकीचे आयोजन माजी अध्यक्ष आनंद मखरे, सचिव शुभम मखरे, खजिनदार सुहास मखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...