इंदापूर:- ( संतोष तावरे याजकडून )
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व उत्तराधिकारी प.पु.कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने आज शुक्रवार दि.22/3/2024 रोजी अवसरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जगदंगुरुश्रींच्या नवीन आरती शुभारंभ व प्रवचन सोहळा सायंकाळी ठीक 05:00 वाजता आयोजित केला आहे.
स्व स्वरूप संप्रदाय इंदापूर तालुका सेवा समिती अंतर्गत वरकुटे खुर्द सेवाकेंद्र समितीच्या वतीने व अवसरी ग्रामस्थांच्या वतीने प्रवचनाचे आयोजन केले आहे. अशी माहिती शिवसृष्टी न्यूजला बोलताना आयोजकांनी दिली. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे प्रवचणकार सौ. सरिता नितीन भागवत यांचे सुश्राव्य अशा प्रवचनाचा आस्वाद परिसरातील ग्रामस्थांनी घ्यावा ही विनंती.
प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन अवसरीतील भक्ताच्या वतीने केले आहे.
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराजांना आपल्या मनातील इच्छा प्रकट केल्यानंतर ती इच्छा लगेच पूर्ण होते, अशीच भावना सर्व लोकांची असते आणि कितीतरी भक्तगनांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव भक्तगणांनी घेतले आहेत कारण लोकांची तेवढी महाराजांवरती श्रद्धा आहे.
तरी वरील प्रमाणे सर्व कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन केले असून अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व इंदापूर तालुक्यातील आजी माझी पदाधिकारी भक्त शिष्य साधक हितचिंतक धामयात्री या सर्वांनीच आरती, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या