इंदापूर:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कर्तुत्ववान तसेच कष्टकरी महिलांचा सन्मान लिनेस क्लब शहा यांनी केला.. या कार्यक्रमात पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ जयश्रीताई गटकुळ ,लिनेस क्लब इंदापूरच्या अध्यक्ष उज्वला ताई गायकवाड महिला दक्षता समिती सदस्या निलोफर पठाण, महिला दक्षता समितीच्या सदस्यां निर्मलाताई जाधव , मंजिरी लावंड ,अर्चना शिंदे सुनंदा अरगडे यांचा सन्मान केला या वेळी बोलताना जयश्री खबाले म्हणाल्या की,
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोनं 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केलं. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचं स्वरूप बदलत गेलं, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे ग्रामीण भागातील शेतकरी होतकरू महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असे लिनेस क्लब शहा अध्यक्षा जयश्रीताई खबाले यांनी सांगितले..या कार्यक्रमात लिनेस क्लब शहा सचिव योगिता चोपडे, खजिनदार प्रियांका जाधव. मनिषा पाडुळे, सुनिता पाडुळे वैशाली जाधव उपस्थित होत्या
टिप्पण्या