*एका कर्तृत्ववान महिलेचा सामाजिक, राजकीय प्रवास मा.शकुंतला रत्नाकर मखरे ( काकी) यांचा सामाजिक, राजकीय प्रवास*
महिला दिन विशेष
बहुजन महापुरुष,महामातांच्या विचारांची शिदोरी घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या, दीन- दुबल्यांचे अश्रु पुसणाऱ्या, शांत, संयमी, कुटुंबवत्सल, प्रसंगी आक्रमक, स्पष्टवक्त्या, सडेतोड वृत्ती आणि निर्भिडपणा हा बाणा असलेल्या आदरणीय शकुंतला रत्नाकर मखरे
शकुंतला मखरेंच माहेरच नाव शकुंतला महादेव जगताप जन्म १४ जानेवारी १९५६ रोजी इंदापूर तालुक्यात हिंगणगाव येथे झाला. त्यांच इ. ७ वी. पर्यंत शिक्षण झालं. आणि पुढे इंदापूर येथील हरहुन्नरी आणि वादळी व्यक्तिमत्त्व असलेले इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर(तात्या) मखरेंशी दि.२६ मे १९७४ रोजी विवाहबद्ध झाल्या.
पुढे शकुंतला मखरे या जनमानसात काकी नावाने परिचित झाल्या.
तात्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अशा स्थितीतही काकींनी पतीला साथ दिली. पत्नीचं कर्तव्य बजावलं. कोणतीही परिस्थिती हसत स्वीकारणारी कर्तृत्वशालीन खंबीर स्री म्हणजे काकी होय.त्या काळात ग्रामीण भागातील महिला फारशा राजकारणात नसायच्या. परंतु ज्यांना काळाच्या भाळावर नाव कोरायचं असतं त्यांना काळ कधीच आडवा येत नाही. तर कर्तृत्ववान माणसाचे स्वागत करण्यासाठी काळ सुद्धा सज्ज होऊन उभा राहत असतो. काकींनी इंदापूर नगरपालिकेची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला. सन - १९९२ ते १९९७ या पंचवार्षिक नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्या. परंतु त्या दरम्यानच नगर परिषदेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत वर्षभरातच नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.राजकारण हे व्यक्तिगत लाभासाठी नसून ते समाज हितासाठी आहे, अशी ज्यांची धारणा असते. त्यांचे धोरणेही निश्चित चांगली असतात. म्हणूनच आपल्या मातीशी नाळ असलेल्या काकींनी महिलांच्या हितासाठी विविध योजना नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आणल्या. इंदापूर शहरातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून मदत केली.निराधार, वृद्ध महिलांना मदत करणारी व मायेची सावली देणारी निराधारांची माय.. काकी. सर्वांनाच हे दातृत्व, कर्तृत्व भगवंत देत नाही, पण अशी काही माणसं काकींच्या रूपात क्वचित सापडतात. अंधाराला चिरून वर आलेल्या या लेकीनं संघर्ष नुसता झेलला नाही, तर पेललाय..
अनेक चढ-उतार पाहिले ज्यांच्या पापणीआड सामान्य माणसाच्या वेदना असतात. त्यांच्याच नजरेतून कळवळा, कणव बरसत असते. काकीच्या नजरेत जशी जरब आहे. तसाच करूणा भावही आहे. कणखर मनाच्या तळाशी वात्सल्यही आहे.काकी घराची कणा आहेत. त्यांच्यातल्या ममत्वाचे दर्शन घडत असते. इंदापूर शहरातील पीडित, वंचित, आबालवृद्धांची सावली, मायेची,ममतेची माऊली आहेत. कोणाही सामान्याची काळजी करणारी आई आहे.
काकींनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. यशाची शिखरे अनुभवले आहे.. मानसन्मान मिळाले आहेत.पती दिवंगत रत्नाकर मखरेंच्या पश्चात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या या नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची धूरा सक्षमपणे सांभाळत आहेत. आश्रमशाळेतील मुला- मुलींचे आपण पालक आहोत,याचे भान प्रत्येक वेळी स्वतः जपताना आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही देत असतात. वसतिगृहातील सुखसोयी, जेवण, स्वच्छता या आणि अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टींवर कटाक्षाने त्यांचे व्यक्तिगत लक्ष असते. मनमिळावू स्वभावाच्या आणि प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या काकी ह्या वटवृक्षासारखी सावली आहे.
समाजात वावरताना कुटुंब आणि समाजकारणातही त्यांनी आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे. जगताना सर्वसामान्य माणसाला ज्या अडचणी येतात,ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्या गोष्टी देखील त्यांच्या वाट्याला आल्या. त्यांनी आव्हानांना आणि संकटांना आपल्या हिम्मतीने तोंड दिलं.कोणत्याही कठीण प्रसंगी शांत राहून निर्णय घेण्याची कला काकींना अवगत आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे असायला हवे "हम भी किसी से कम नही !" हा विश्वास नेहमी काकी महिलांच्यामध्ये जागवत असतात.
काकींनी स्वतःची साडेपाच एकर जमीन मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेला वापरासाठी दिली असून, त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नावाने भव्यदिव्य ,सुसज्ज असे शैक्षणिक संकुल दिमाखात उभे आहे.येथे इ.१ ली ते इ.१२ वी.चे ३६८ मुले - मुली निवासी शिक्षण घेतात.तसेच अनिवासी विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. येथे सर्व ५०० च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात.सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. पतीच्या निधनानंतर अनेक संकटे वादळासारखी आली. पण काकी खचल्या नाहीत. ज्या झाडांची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली असतात ती वादळातही भक्कमपणे उभी असतात. काकींनी वादळांनाही ताकदीने शांत केलं.आपल्या पतीकडून मिळालेल्या राजकीय डावपेचांचा वापर त्या मोठ्या हिंमतीने करतात.*आदरणीय काकींनां जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !*💐💐💐💐💐
*शुभेच्छुक*:-
*श्री.नानासाहेब सानप सर*
(*भिमाई आश्रमशाळा इंदापूर*)
टिप्पण्या