*विधानसभेचा निर्णय नंतर घेऊ.आता लोकसभेचा प्रचार करा देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यशअजित पवार -हर्षवर्धन पाटील यांची दिलजमाई*
इंदापूर
-अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली शिष्टाई अखेर यशस्वी ठरली. 'बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा,' अशा शब्दांत फडणवीस यांनी पाटील यांना समज दिल्याचे समजते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी पुकारलेले बंड अखेर थंड झाले आहे. पुढील आठवड्यात इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याची तयारी करण्याची सूचना फडणवीस यांनी पाटील यांनाकेली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात महायुतीतील,भाजपचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले;तसेच तालुक्यात कार्यकत्यांचे मेळावे घेऊन दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील यांना यश आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील साहेब यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या धमक्या आणि अर्वाच्य शब्दांत होणारी शिवीगाळ यांसारख्या तक्रारी फडणवीस यांच्याकडे केल्या. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले होते. त्यानुसार, फडणवीसांनी पुन्हा रविवारी रात्री 'सागर' बंगल्यावर हर्षवर्धन यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत दोन तास चर्चा केली.
'बारामतीतील महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करा,' अशा शब्दांत हर्षवर्धन यांना फडणवीस यांनी समज दिल्याचे सांगितले जात आहे; तसेच 'कार्यकत्यांनाही तशी समज द्या. विधानसभेचा निर्णय नंतर घेऊ. आता लोकसभेचा प्रचार करा,' अशी सूचना फडणवीसांनी हर्षवर्धन यांना केली. इंदापूर तालुक्यात पुढील आठवड्यात भाजपचा मेळावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः फडणवीस हे मेळाव्यासाठी येणार आहे. त्याची तयारी करा, असेही त्यांना सांगण्यात आले आहे; तसेच हर्षवर्धन पाटील
यांना समज दिल्यानंतर
टिप्पण्या