इंदापूर :
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चाँदशाहवली बाबा यांच्या दर्गाहमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांनी दर्शन घेतलं ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपण प्रेम केले. त्याच पद्धतीने यापुढेही साथ द्या असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी इंदापूरकरांना केलं आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होत आहे.. या पार्श्वभूमीवर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातील गडकिल्ल्यांना भेटी देणार आहेत. तसेच या ठिकाणी अभिषेक आणि पूजाही होणार आहे. आज सकाळी इंदापूरच्या वीरश्री मालोजीराजे गढीवर शिवजयंती साजरी करत या दौऱ्याचा प्रारंभ करण्यात आला.. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस,हमिदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर,आझाद पठाण, अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष अल्पसंख्यांक रा.काँ. इंदापूर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते...
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या