महाडच्या चवदार तळ्यास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संजय भैय्या सोनवणे.अनेक कार्यकर्त्यांसह उपस्थित
इंदापूर:- महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी झाला होता. त्यानंतर अनेक वर्षं हा दिवस 'समता दिन' तसंच 'सामाजिक सबलीकरण दिन' म्हणून साजरा केला जातोआतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलनं झाली, भारतीय राज्यघटनेने या देशातल्या सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान केला. पण पाण्याच्या प्रश्नावरुन जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा उफाळून येतात याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहतो आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजूनही समाजात पाझरताना दिसतो.अशा या अनमोल भूमीस चवदार तळ्यास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मा.श्री संजय भैय्या सोनवणे.
यांच्यासोबत महाराष्ट्रातील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तमाम नेते ,पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, "चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे."सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे. 'आम्हीही माणसे आहोत' हे जगाला सांगण्यासाठीचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही. त्यामुळे या महाडच्या सत्याग्रहाचं मोल आजही अधोरेखीत होतंय. आसे मत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नेते मा.श्री संजय भैय्या सोनवणे.यांनी व्यक्त केले,
टिप्पण्या