इंदापूर:-पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे आयोजित केलेल्या 25 दिवसाचे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर पतंजली योग समिती इंदापूर यांचे वतीने यशस्वीरित्या पूर्ण केले. भारत स्वाभिमान महाराष्ट्राचे राज्यप्रभारी बापू पाडळकर केंद्रीय युवा सहप्रभारी स्वामी ऋतुदेवजी ,अतुल आर्य,तहसिलप्रभारी जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनातुन या प्रशिक्षणामधून परिसरातील 50 नवीन योग शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष तालुका प्रभारी मल्हारी घाडगे यांनी दिली
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर माजी नगराध्यक्षा अलका ताटे शहराध्यक्षा उमा इंगोले आणि सर्व महिला योगशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पत्रकार श्री.सागर शिंदे यांनी नवीन योगशिक्षकांना शुभेच्छा देताना सांगितले नवीन योगशिक्षकांनी योगाची सेवा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावी हीच समाजसेवा,राष्ट्रसेवा आहे. पतंजली योग समिती ही मोफत योगवर्गातुन अनेकांना निरोगी करीत असल्याबद्दल योग समितीच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना गुलाब पुष्प घेऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे योग शिक्षक श्री प्रशांत गिड्डे, मल्हारी घाडगे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी अशोक अनपट, जयश्री सरवदे,वर्षा ननवरे,बाजीराव शिंदे, राजेंद्र चव्हाण, भीमराव वनवे,बिभिषन खबाले यांनी शिबिराविषयी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्वांना मोड आलेली कडधान्ये आणि कच्च्या फळभाज्यांचा पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रामेश्वर साठे, भालचंद्र भोसले,सुधाकर दोंड, देवराव मते,चंद्रकांत देवकर, हमिद आतार,किसन पवार, सुनिल कांबळे, शरद झोळ, अण्णासाहेब चोपडे, अशोक जगताप,महादेव गव्हाणे, भारत कांबळे, समाधान भोरकडे, सायरा आतार, रेखा भंडारी, दैवशाला राऊत, रश्मी निलाखे,कवितके ताई,यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र परबत यांनी केले..
टिप्पण्या