मातोश्री हीराबेन मोदी देशासाठी आदर्श माता - हर्षवर्धन पाटील इंदापूर:- मातोश्री हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदी यांना संस्कार व नीती मूल्ये यांचे धडे देऊन देशासाठी महान सुपुत्र दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व घडविले. मातोश्री हीराबेन मोदी आदर्श माता म्हणून देशवासीयांच्या कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हीराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मानवी जीवनामध्ये आईचे स्थान सर्वोच्च असते. त्यामुळे आईचे निधन हा अतिशय दुःखदायक क्षण असतो, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. संपूर्ण देश या दुःखदायक घटने प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या परिवारा सोबत आहे. मातोश्री हीराबेन मोदी यांचे आदर्श मातेचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
SHIVSRUSTHI NEWS