इंदापूर:- तालुका प्राथ. शिक्षक सोसा. च्या सचिव पदी श्रीअंबादास नरुटे तर सहसचिव श्री. वासूदेव पालवे, श्री.उज्ज्वलकुमार सुतार , श्री.सचिन वारे यांची नुकतीच निवड करण्यात आली.*
*शिक्षक सोसायटीच्या कामाचा खूप मोठा कारभार पाहता काम काज वेळेत आणि अचूक होणे आवश्यक आहे.तसेच
*सभासद बांधवांना तात्काळ व अचूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठीच सचिवां बरोबरच सहसचिव यांची निवड करण्यात आली.सचिव व सह सचिव हे शिक्षक सोसायटी मधील सर्व कामकाज कोणत्याही आर्थिक लाभ न घेता केवळ सेवाभावी वृत्तीने करणार आहेत.
*सदर निवडी दरम्यान माननिय सभापती श्री.दतात्रय ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपसभापती श्री.सतिश गावडे मा.सभापती अदिनाथ धायगुडे, मा. उपसभापती रामचंद्र शिंदे,मा. सचिव प्रशांत भिसे, जेष्ठ संचालक बालाजी कलवले तसेच दत्तात्रय चव्हाण, अनिल शिंदे, सतिश दराडे, भारत बांडे, किशोर वाघ, संजय म्हस्के*,
*भाऊसाहेब वनवे, शशिकांत शेंडे, प्रशांत घुले, संतोष गदादे,*
*सचिन देवडे, संतोष तरंगे, सदाशिव रणदिवे, संचालिका संगिता पांढरे, संजिवनी गरगडे, तज्ञ संचालक रतिलाल कुचेकर,सतिश भोंग तसेच*स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे प्रमुख तथा
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.नानासाहेब नरुटे, इब्टा संघटनेचे अध्यक्ष सहदेव शिंदे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुहास मोरे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतिश शिंदे तसेच स्वाभिमान परिवारातील माजी संचालक तथा शिक्षक संघाचे नेते उध्दव गरगडे, सुरेश पांढरे तसेच अनेक शिक्षक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.*
*सचिव व सह सचिव यांच्या निवडी बद्दल आणि मा,सचिव प्रशांत भिसे व सहसचिव ताहेर शेख यांच्या कामाचे कौतुक सभापती ठोंबरे यांनी केले.*
स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे प्रमुख तथा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.नानासाहेब नरुटे व सुहास मोरे यांनी सचिव व सहसचिव यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या व कामकाजा विषयी मार्गदशन केले. श्री.अंबादास नरुटे सचिव यांनी सर्वांविषयी आभार व्यक्त केले .*
टिप्पण्या