इंदापूर दि २६: परमपूज्य गुरुमाऊलीच्या व श्री चंद्रकांत दादा यांच्या कृपाशीर्वादाने व श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रथ व पादुका यांचे, आगमन झाले इंदापूर शहरातील व तालुक्यातील भाविकांनी पादुका पूजन करून रथाचे दर्शन घेतले. अशी माहिती स्वामी समर्थ केंद्र इंदापूर शहर प्रमुख सेवेकरी प्रदीप भगत यांनी दिली. इंदापूर शहरातील मयुर हाउसिंग सोसायटी महतीनगर आवारात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये उपस्थित भाविकांना बंसोदे काका वय वर्ष ७८ यांनी स्वामी समर्थांची माहिती सांगितली. यावेळी जे के शिंदे, विकास खिलारे, शिवतेज दडस, महेश वेदपाठक, गुरुनाथ वायकुळे, सागर धारूरकर, निखिल दुनाखे, अथर्व भगत, युवराज जगताप, सोमनाथ तारगावकर, नितीन देवकर पाटील, पंचकमिटी, विभाग प्रतिनिधी, तसेच पुरुष व महिला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मुक्काम संपून इंदापूर शहरांमध्ये आगमन झाले. यावेळी पादुका पूजनसाठी १८३ भाविकांनी दर्शन घेतले व धान्य पूजनसाठी १०६ भाविकांनी दर्शन घेतले. खूप मोठ्या संख्येने पादुका पुजा सेवा सेवेकरी व भाविकांनी राजोपाचार पादुका पूजन व धान्य पूजन या दोन्ही पूजा परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने माननीय श्री सतीश दादा मोटे यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाल्या. तसेच सर्व महिला व पुरुष सेवेकरी यांनी मेहनत घेऊन सर्व सेवा श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी सेवा रुजू केली. दि २७ रोजी बेलवाडी थोरातवाडी या ठिकाणी भाविक भक्तांना दर्शन मिळणार असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे ज्येष्ठ सेवेकरी युवराज राऊत यांनी सांगितले.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या