इंदापूर:- ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे. यांनी दिनांक ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२२ रोजी सहलीचे आयोजन केले होते.३ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मा.श्री. हर्षवर्धन पाटील आणि मा.श्री. भरतशेठ शहा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर बिजवडी यांच्या शुभहस्ते गाडीची पूजा करून, ४० ज्येष्ठ नागरिक सहलीला गेले. हे सर्व ज्येष्ठ नागरिक वय वर्ष ७० च्या पुढे होते. सहलीचे अध्यक्ष श्री बाबासाहेब घाडगे , सहलीचे उपाध्यक्ष श्री भानुदास पवार, सहलीचे सचिव श्री काशिनाथ जगताप, संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, उपाध्यक्ष पांडुरंग जगताप, खबाले महाराज, संघाचे सचिव हनुमंत शिंदे, संघाचे खजिनदार चौधरी विष्णुपंत, या सर्वांच्या नियोजनातून सहलीला गेले, सहलीमध्ये पाचगणी येथे टेबल लँड पाहिला पुढे महाबळेश्वर येथे गेलो तेथे इको पॉईंट, लेख सरोवर, अर्थर स्वीट ,पाहिले हे पाहून झाल्यानंतर नाष्ट्यासाठी पौष्टिक डिंक लाडू श्री जगताप काशिनाथ यांनी आणले होते ते सर्वांना दिले. प्रतापगड पाहण्यासाठी गेलो. पुढील प्रवासास निघालो महाडला पोचलो तेथे चवदार तळे पाहून पुढे रायगड किल्ला पाहण्यासाठी गेलो. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळे येथे गेलो, मनोभावे दर्शन झाल्यानंतर पावस येथे पोहोचलो तेथे स्वरूपानंद स्वामींचे दर्शन घेतले, नानिज येथे नरेंद्र महाराजचा मग पाहिला. पुढे कोल्हापूर येथील दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या ज्योतिबाचे दर्शन घेऊन पुढे महालक्ष्मीचे दर्शन घेतले परतीच्या प्रवासाला निघालो, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सहलीचा उपक्रम मनोधैर्य वाढवणारा ठरला, जीवनामध्ये येऊन जी ठिकाणी पाहायला मिळाले नाही ते ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर पाहायला मिळाली यातच मोठा आनंद होता. अशी प्रतिक्रिया जेष्ठ नागरिकांनी दिली सहलीचा आनंद मनसोक्त घेता आला जीवन सार्थकी लागल्यासारखे झाले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वांनी आभार मानले सर्वांना घरी पोचवले त्याबद्दल मनःपूर्वक अध्यक्षांचेआभार.माणले,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या