इंदापूर प्रतिनिधी
: सध्या ऊस वाहतूक व साखर कारखाना यांना भेडसावत असणार विषय म्हणजेच ऊसतोड मुकादम. या मुकादमांनी आतापर्यंत बरेच ऊस वाहतूक करणारे मालक व शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला असल्याने साखर कारखाने ही अडचणीत सापडले आहेत. यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजु पाटील यांनी सांगली, कोल्हापूर येथे मोर्चे काढून प्रत्त्येक ठिकाणी निवेदन ही देण्यात आले. या विषयात मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी लक्ष दिल्याने तातडीने मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत मिटींगचे आयोजन केले व यात स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल असे आश्वासन दिले.
नुकतेच नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी साखर कारखाने व ऊसतोड वाहतूक मालकांची होणारी फसवणूक टाळण्याकरीता गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या मार्फत कारखान्यांना ऊसतोड मजुर पुरविण्याच्या अनुशंगाने विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केले. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षण नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी करीता वेब पोर्टल तयार करण्याची कार्यवाही गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री श्री. अतुल सावे यांनी दिली.
या मंडळावर एक कमिटीची स्थापना करुन यात ऊस तोड लेबर व वाहतूक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ,आयएएस अधिकारी, साखर आयुक्त व सर्व तज्ञ मंडळींची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्री.राजु पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याच धर्तीवर कराड येथे लवकरच मोठ्या प्रमाणावर मोर्चाचे नियोजनासाठी दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जयसिंगपूर चौंडेश्वरी सुतगिरणी मंगोबा मंदिर याठिकाणी सांगली. कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील सर्व सभासद व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिटींगचे आयोजन केले आहे.
टिप्पण्या