इंदापूर:- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माळवाडी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला. सदर निवडणूकीमध्ये आमचे मित्र श्री बाळासाहेब व्यवहारे यांच्या पत्नी सौ.मंगलाताई बाळासाहेब व्यवहारे या सरपंचपदी निवडून आल्या. आज त्यांचा सत्कार बाब्रस मळा येथे धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मा. उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी, जेष्ठ नेते एकनाथराव गारदी, मा.नगरसेवक व मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा.नगरसेवक व मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस, युवा नेते निखीलशेठ बाब्रस, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत शिंदे, बाळासाहेब म्हेत्रे, मा.नगरसेवक हरिदास हराळे, शिवसेना नेते ज्ञानेश्वर चौगुले, स्वप्नील मखरे, सुभाष खरे सर, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अहमदराजा सय्यद, रमेश बनसोडे, मनोज भापकर, अनिल चव्हाण, दत्तू शिंदे, समीर दुधनकर, गणेश गोरे, लक्ष्मण घुगे, अजित शेंडगे, प्रमोद जाधव, गणपत गवळी, दुर्योधन ठावरे, सोपान भोंग गुरुजी, दशरथ बनसोडे, नागेश हरणावळ, लक्ष्मण गवळी इ. उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या