इंदापूर:- 6 डिसेंबर महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त पतंजलि योग समिती युवा भारत यांचे वतीने सुरु असलेल्या नगरपालिकेजवळील जि.प. शाळा नं1 व 2 येथील स्थाई योगवर्गामध्ये अभिवादन करण्यात आले.
प्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन अॅड. चंद्रशेखर दोशी ,डाॅ दत्तात्रय कांबळे यांचे हस्ते करण्यात आले योग समितीचे सहप्रभारी भालचंद्र भोसले यांनी त्रिशरण आणि पंचशिलचे पठन करुन अभिवादन करण्यात आले.राजेंद्र चव्हाण यांनी बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवा प्रभारी सचिन पवार,शरद झोळ,भारत स्वाभिमानचे सहप्रभारी बिभिषण खबाले,गोकुळ हराळे,रविंद्र परबत महिला प्रभारी सायरा भाभी आतार, सौ.जयश्रीताई खबाले मेघाताई भंडारी यांचेसह अनेक योगसाधक उपस्थित होते.
टिप्पण्या