मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकास कामांचे श्रेय हर्षवर्धन पाटलांनी घेऊ नये - सचिन सपकळ,

इंदापूर:-  भाजपचे तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून सात गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे प्रेस नोट प्रसिद्ध केली होती या बातमीस उत्तर देताना जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ त्यांनी जामदार यांना खोटे पाडत  जामदार हे धादांत खोटे बोलत असल्याचे कागदपत्रांनिशी पुरावा देत उघड केले आहे.यावेळी भरणेवाडी येथील पाणी पुरवठा योजना सुध्दा हर्षवर्धन पाटील यांनीच  मंजूर केल्याचे सांगत असताना भरणे मामांच्या वस्तीवरील पाणी पुरवठा योजना देखील आम्हीच मंजूर केल्याचे सांगायचे कोणत्या नादात विसरले की काय असा उपरोधीत टोला यावेळी सपकळ यांनी लगावला...

यावेळी बोलताना सचिन सपकळ यांनी सांगितले की, जल जीवन मिशन योजनेचा प्रारुप आराखडा हा 12 मार्च 2021 रोजी तत्कालीन पालकमंत्री व जलजीवन योजनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याचा प्रारूप आराखडा मंजूर झालेला आहे जामदार यांनी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की प्रारूप आराखडा मंजूर झाल्यानंतर सदर योजनेचे त्या गावांमध्ये जाऊन पाण्याचा स्त्रोत  साठवण टॅंक, वितरण नलिका या सर्व बाबींचा यंत्रणेमार्फत सर्वे करून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून अंदाजपत्रक तयार केले जाते व हे अंदाजपत्रक जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे सादर केले जाते व या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता दिली जाते व शेवटची प्रक्रिया म्हणून त्यास प्रशासकीय मंजुरी दिली जाते यांना आराखड्यातील मंजुरी व प्रशासकीय मंजुरी यामधील फरक जर समजत नसेल तर राजकारण करण्याऐवजी जनतेनी दिलेली विश्रांती पाटील यांनी  मान्य करून घेतलेली बरी.असे सपकळ म्हणाले

या योजनेचा सुरुवातीचा आराखडा मार्च 2021 ला 250 कोटी मंजूर झाला होता त्यानंतर जून 2022 मध्ये डी एस आर रेट मध्ये बदल झाल्यानंतर हाच आराखडा 454 कोटींचा झाला तसेच महाराष्ट्र जीवण प्राधिकरण यांच्याकडे असणाऱ्या 26 गावांचे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याचा 600 कोटीपेक्षा जास्त आराखडा झाला हे केवळ माजी राज्यमंत्री तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने झाला असल्याचे सचिन सपकळ यांनी सांगितले.

तसेच जी प्रेस नोट आपण प्रसिद्धीसाठी दिली ती कामे टेंडर प्रक्रिया करता ऑनलाइन प्रसिद्धी करीता आली आहे. जल जीवन मिशन योजनेमध्ये एखादे गाव काम करत असेल तर त्या गावात किमान ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड वर्षाचा कालावधी लागत असतो यांचे सरकार येऊन फक्त पाच महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी सोडून इतर कोणतीच बाब या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये झालेली नाही. आसे सपकळ म्हणाले, 


इंदापूर तालुक्यात 7 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना शिवसेना-भाजप सरकारकडून मंजुरी -अँड. जामदार 

 इंदापूर:-  तालुक्यातील 7 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नामुळे शिवसेना -भाजप युती सरकारकडून चालु नोव्हेंबर/डिसेंबर 2022 मध्ये मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी रविवारी दि. 4 दिली.

             राज्यातील सत्तारूढ झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना-भाजपने सरकारने इंदापूर तालुक्याची जनतेला दिलेली भेट आहे. योजनेस मंजुरी मिळालेली गावे पुढीलप्रमाणे:- वडापुरी - (रु.13.55 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)., वालचंदनगर - (रु.46.45 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)., सणसर - (रु.54.54 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22)., उद्धट- प्रादेशिक पाणीपुरवठा योजना - (रु.102.65 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22)., शेळगाव - (रु.49.30 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22)., भरणेवाडी - (रु.16.32 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)., कळस- (रु.27.97 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)

       पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील या 7 गावांच्या योजनांना शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी आभार व्यक्त केले.

*************************************

जल जिवन वर दोन्ही पक्षांचा दावा, वस्तुस्थिती उद्घाटन कोण करणार यावरून ठरेल, मंजूरीचे मानकरी कोण?पाटील की भरणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...