नागरिकांनी मास्क वापरून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - पै.अशोकभाऊ देवकर
इंदापूर:- सध्या चीनसह इतर देशामध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ची भीती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून कोरोनाच्या नियमांचे पालन करीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर यांनी
केले आहे.
पै.अशोकभाऊ देवकर म्हणाले की,' कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असुन या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घ्यावी. योग्य खबरदारीच्या आधारे हे संकट टाळता येईल.पण कोणीही घाबरून जाऊ नका, आफवावर विश्वास ठेऊ नयेत, पण आपली काळजी आपणच घ्यावी,
टिप्पण्या