इंदापूर:- तालुक्यात व शहरात काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्ष अनेक जनाने सोडला असतानाच भाऊसाहेब आंधळकर यांचे खंदेसमर्थक व इंदापूर शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर यांचे माध्यमातून तालुक्यातून इंदापूर तालुक्यात फारमोठे फेरबदल होणार आहेत, आज दि. 03/012/2022 रोजी माजी जलसंपदा मंत्री श्री. विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे इंदापूर तालुका समन्वयक श्री. ज्ञानेश्वर चौगुले व इंदापूर तालुका क्षेत्र प्रमुख श्री. सुरज काळे यांनी सासवड येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करुन ठाकरे गटाला दिला धक्का. चौगुले व काळे यांना पदे देऊन सतत खच्चीकरण केले जात असत यामुळे आम्ही शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंदर जेवरे,श्री.बबन खराडे, आण्णा काळे युवासेना,इंदापूर शहर प्रमुख पै.अशोकभाऊ देवकर, अवधूत पाटील, बालाजी पाटील सह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या