इंदापूर:- ट्रॅक्टर वाहतूक गावांतून असल्यामुळे
आय कॉलेज समोर एक नाहक महाविद्यालय युवतीचे जाग्यावर आयुष्य संपले..कधी होणार ट्रॅक्टर वाहतूक बंद गावांतून?इंदापूर शहरामध्ये रविवारचा बाजार व उसाचा ट्रॅक्टर या गोष्टी नागरिकांसाठी धोकादायक आहेत याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे निष्कारण एखाद्याचा जीव लापरवामुळे जात आहे निस्ता सिग्नल बसवून कोण ऐकणारआहे कोण थांबणार, गर्दी कमी केली पाहिजे याला जबाबदार इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आहे.
पुणे सोलापूर हायवेला दररोज दहा पंधरा हजार विद्यार्थी रस्त्याने प्रवास करीत असतात त्याचबरोबर इंदापूर बस स्थानक आहे त्यामुळे हजारो प्रवासी देखील याच रस्त्याने प्रवासी प्रवास करतात त्यामुळे आज फक्त एका मुलीचा जीव गमवावा लागला मात्र भविष्यात हजारो माणसांचे जीव जातील त्याला जबाबदार कोण ?
इंदापूरच्या बाहेरून सर्विस बायपास रस्ता केला असताना इंदापूर शहरात वाहन आणणे गैरच आहे कारण इंदापुरातून मोठा रस्ता नेहमी गैरसोयीचा असल्यानेच रस्ता बाहेरून नेलेला आहे तरी देखील मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्या उसाचं अनेक टन वाहतूक करणारे ट्रॅक्टर इंदापूर शहरातूनच येतात एक तर वाहतूक पोलीस आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, मागील पंधरवडय़ात आपघात घडलेल्याच ठिकाणी लक्झरी बस एका टपरीवर आदळून मोठा अपघात घडला होता, पण प्रशासन मात्र मुग गिळून गप्प आहेत, दोन दिवसांत अवजड वाहने इंदापूर शहरातून येने जाने बंद न केल्यास शिवसेनेच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात येईल, आशी माहीती, बाळासाहेबांची शिवसेना इंदापूर शहरप्रमुख पै.अशोकराव देवकर यांनी आज पत्रकारांसमोर बोलताना सांगितले,
टिप्पण्या