इंदापूर:- सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान, इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्ण पान आणि एकूणच इंदापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या ४५८ व्या उरूसाला गुरुवार पासून (१ डिसेंबर, मार्गशीर्ष ८) सुरुवात झाली. गुरुवारी संदलचा कार्यक्रम पार पडला असून, शुक्रवारी (२ डिसेंबर) मुख्य उरूस, तर शनिवारी (३ डिसेंबर) झेंड्याचा (ग्राम प्रदक्षिणा) कार्यक्रम मा.प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे यांच्या हस्ते नारळ फोडून झेंड्याची मिरवणूकीला सुरूवात झाली,
यावेळी मानकरी श्रीधर बाब्रस,मुनीर मुजावर, तसेच उरूस कमिटीचे अध्यक्ष आझाद पठाण, उपाध्यक्ष महादेव चव्हाण आणि प्रमुख मानकरी हमीद आत्तार, अहेमदरजा सय्यद, सह इतर मान्यवर उपस्थित होते, या वेळी बोलताना गारटकर म्हणाले की,
यावर्षी मात्र कोरोनाचे सावट हटल्याने उरूसोत्सव शासनाच्या निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, इंदापूर तालुक्यातील सर्वधर्मीयांचा उत्सव म्हणून या ऊरूसाकडे पाहीले जाते, आसे ही गारटकर म्हणाले,
टिप्पण्या