इंदापूर:- वाढत्या विषारी कीटकनाशक वापराच्या पार्श्वभूमीवर जैविक किड नियंत्रण काळाची गरज बनली आहे. कीटकनाशकांमुळे शेती उत्पादन विषय युक्त बनवून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.मोठ्या प्रमाणात खर्च करू नये काही वेळेस कीड नियंत्रणात येत नाही .जैविक किड नियंत्रणात ट्रायकोकार्डचा वापर हा एक प्रभावी उपाय आहे. कृषी पदवीच्या आठव्या सत्रातील कार्यानुभवात्मक शिक्षण या अंतर्गत अमृता भिसे, आयुषी मित्तल, अनुप कुंघटकर व ऐश्वर्या शर्मा इत्यादी विद्यार्थी डॉ. न. द. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक कीडनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यापैकी एक मित्र कीटक ट्रायकोग्रामा तयार केला जात असून तो विक्रीसाठी उपलब्ध आहे.अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणामध्ये उपयुक्त ठरणारा ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी मित्र कीटक आहे.
# **विविध किडींवर नियंत्रण:-*
१)प्रामुख्याने कापसावरील बोंड अळीची अंडी नाश करतो.
२) उसावरील खोडकिडा पतंगवर्गीय किडींचा नाश करतात .
३)टोमॅटो भेंडी वांग्यावरील फळ पोखरणारी अळी.
४)भुईमूग सूर्यफुलावरील अळी.
# *काय आहे ट्रायकोग्रामा:-*
ट्रायकोग्रामा हा एक सूक्ष्म क्रीडा असून जवळपास 200 प्रकारच्या किडींच्या अंड्यांवर उपजीविका करतो. ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पिकांवरच्या किडींनी दिलेल्या अंड्यांमध्ये प्रवेश करून त्यातून अळी निघण्यापूर्वीच त्यांना नष्ट करतो.
# *ट्रायकोग्रामाची कार्यपद्धती* :-
ट्रायकोग्रामा हा सूक्ष्म मित्र कीटक शेतात फिरून किडीच्या अंड्यांमध्ये स्वतःचे अंडे टाकतो.ट्रायकोग्रामाची
१)अंडी अवस्था १६ ते २४ तास
२)अळी अवस्था २ ते ३ दिवस
३)कोषावस्था दोन ते तीन दिवस
४)७ व्या किंवा ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा शत्रू किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो.
प्रौढ ट्रायकोग्राम पुढे दोन ते तीन दिवस शेतात फिरून अळीवर्गीय किडीच्या अंड्यांचा शोध घेऊन त्यात आपली अंडी घालतो.अशा पद्धतीने हा शेतकऱ्यांना कीड नियंत्रणात मदत करतो.
# *ट्रायकोकार्ड चा वापर:-*
१)पतंगवर्गीय किडींचा नाश करण्यासाठी पिकांवर एकरी २ ते ३ कार्ड्स १० ते १५ दिवसांनी २ ते ३ वेळा लावावे
२)उसावरील खोडकिड्यावर एकरी चार ते पाच कार्ड्स दर दहा दिवसांनी आठ ते दहा वेळा लावावे.
३) कापूस पिकावरील बोंड अळ्यांसाठी एकरी २ ते ३ कार्ड्स दर १० दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा लावावे.
*आपल्याला ज्यावेळी पिकांवर कीटकांची अंडी दिसतील त्यावेळी हे ट्रायको कार्ड पानाच्या मागच्या बाजूला जमिनीकडे करून झाडांना लावायचे .
*ट्रायको कार्डचे प्रसारण शेतामध्ये लावल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा.
* ट्रायको कार्ड हे 24 तासांच्या आत शेतामध्ये वापरावे.
टिप्पण्या