इंदापूर:- नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोर्चा चे आयोजन केले होते. त्या मोर्चास माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार मा. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी भेट देऊन अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी मामांनी दिला. या मोर्चास आ. नितीन पवार, आ. इंद्रनील नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या