इंदापूर शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बंद करा- पै.अशोकराव देवकर बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख ,
इंदापूर:- विभागाच्या अंतर्गत येत असलेला जुना पुणे-सोलापूर हायवे हा इंदापूर शहरातून जात आहे. या रोडवरून अवडजड वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे अत्तापर्यंत बरेच अपघात झालेले आहेत. याच रोडवर कॉलेज, हायस्कूल, प्राथमिक शाळा, बँका तसेच आठवडे बाजार आहे. या रस्तावरून शाळकरी मुले ये-जा करत असुन रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथवर अनाधिकृत व्यवसायकांचे अतिक्रम झाले असल्याने मुलांना व जेष्ठ नागरीकांना रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दि. १० डिसेंबर रोजी एका निष्पाप मुलीचा अशाच अवजड वाहनामुळे जीव गमवावा लागला आहे.जिव गेल्यावर च प्रशासन जागे होणार काय आजून किती जिव घेणार आहात, दोन दिवसात शहरातून होत असलेली अवजड वाहनाची वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यात यावी. तसेच अवजड वाहने शहरात येऊ नये म्हणून शहराच्या बाहेर (बायपास जवळ) आकारण्यात येणाऱ्या दंडाचा बोर्ड कायामस्वरूपाचा बसविण्यात यावा. व नियमानुसार योग्य ती कारवाई व दंड करण्यात यावा. व कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे २ कर्मचारी नेमणूक करण्यात यावी. अन्यथा बुधवार दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर आय कॉलेज समोर रस्ता रोको आंदोलन केले जाईल. पै.अशोकराव देवकर बाळासाहेबाची शिवसेना शहर प्रमुख इंदापूर, जि. पुणे यांनी, उपविभागीय अभियंता सा.बा.इंदापूर, तहसिल कार्यालय, इंदापूर मा. पोलीस निरीक्षक सो.,इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर मा. मुख्याधिकारी सो.. इंदापूर नगरपरिषद, इंदापूर याना निवेदन दिले आसल्याचे देवकर यांनी सांगितले, या वेळेस श्री. अण्णासाहेब काळे, इंदापूर तालुका प्रमुख श्री.बालाजी पाटील , श्री. सुरज काळे,बबन खराडे, निशा शिंदे, अण्णासाहेब काळे, देवा मगर, हरून शेख, दुर्गा शिंदे, रमेश साळुंखे, ज्ञानेश्वर चौगुले, ,शुभम राखुंडे, रमेश साळुंखे,हे शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या