संत गाडगेबाबांनी कीर्तनातून माणुसकीची शिकवण दिली. - प्रा. रेश्मा झेंडे.
तात्यांच्या शाळेत संत गाडगेबाबांना अभिवादन
*इंदापूर*:( दि.२०) संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. समाजातील ज्या अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरा आहेत त्यावर प्रहार केले. लोकांच्या मनातील असलेली अज्ञान, अस्वच्छतेची जळमटे कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला बाबांनी माणुसकीची शिकवण दिली. ते थोर कीर्तनकार होते. अशा शब्दात संस्थेच्या राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. रेश्मा झेंडे यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.
त्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित संत गाडगेबाबांच्या ६६ व्या स्मृतीदिनानिमित्त बोलत होत्या.
यावेळी भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्र. प्राचार्या सविता गोफणे यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार,तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी कु. अंजली गव्हाणे ( इ.७ वी ) ह्या विदयार्थीनीने भाषण केले. तसेच प्रा. सोमनाथ माने, प्र. प्राचार्या सविता गोफणे, मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणे झाली.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक,अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
टिप्पण्या