मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरामध्ये शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे सन्मान योजनेतून मालमत्ता करातून सवलतीसाठी केला पाठपुरावा शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी   इंदापूरः नगरपरिषद या ठिकाणी माजी सैनिकांना बाळासाहेब ठाकरे सन्मान  योजनेअंतर्गत मालमत्ता करातून सूट देण्यासाठी नगराध्यक्षा  श्री. सौ.अंकिता शहा यांना  निवेदन देण्यात आले  या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी  या योजनेचा लाभ  दिला जाईल . असे आश्वासित केले.  यावेळी  श्री मुकुंद शहा यांनी  दानशूर व्यक्तिमत्व गोकुळदास शहा  यांनी लिहिलेले  पुस्तक देऊन सन्मानित केले . यावेळी  जय हिंद माझी संघटेचे पदाधिकारी रविराज पवार ,बाजीराव शिंदे , लक्ष्मण कांबळे, वजीर सय्यद ,शिवाजी भानुसे ,सुनिल पवार ,खंडू शिंदे, नवनाथ सोनवर, राजाराम गलांडे, अनिल माने ,ज्ञानोबा खंडागळे ,मंगेश जाधव, रवींद्र रणवरे  ,श्रीमंत कुंभार ,दत्तात्रय झगडे, विजया बोराटे, कृष्णा बोराटे ,शिवाजी बोराटे, राजू शेवाळे, रितेश शेवाळे, उपस्थित होते, 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कार्यकर्ते व जनतेला सन्मानाची वागणूक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच मिळते-वसंतराव आरडे   इंदापूर :तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व उद्घाटन बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद गटामध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले,            बाभूळगाव पाटी ते भांडगाव या रस्त्याचे भुमी पुजन वसंतराव आरडे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांच्या हस्ते पार पडले ,या वेळी विष्णू पाटील सरपंच शहा,माजी सरपंच संजय देवकर, सुभाष डरंगे, शिवाजीराव जगताप,मनोहर भोसले ,माजी सरपंच भाटनिमगाव, काकासाहेब खबाले, महादेव मिसाळ,हौसराव चव्हाण,गौतम देवकर, आबा पाटील, नितीन पाटील,लहु गवळी,उपस्थित होते, यावेळी आरडे म्हणाले की, कार्यकर्ते आणी सामान्य जनतेला मान सन्मानाची वागणूकफक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच मिळते,त्याचे उदाहरण म्हणजे, तीन कोटी रुपयांच्या कामांचे भुमी पुजन फक्त का...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हिंगणगाव येथे कर भरा लाभ मिळावा योजना सन २०२०-२१अंतर्गत लकी ड्राॅ पध्दतीने कर भरलेल्या व्यक्तीला भेटवस्तू-रमेश देवकर  इंदापूरः तालुक्यातील  ग्रामपंचायत कार्यालय हिंगणगाव येथे मा.सरपंच रमेश (दादा) देवकर यांचे अध्यक्षतेखाली कर भरा लाभ मिळावा योजना सन २०२०-२१अंतर्गत लकी ड्राॅ पध्दतीने पूर्ण कर भरलेल्या मिळकत धारकातून खालील प्रमाणे लाभार्थी निवड करण्यात आले.  इतर घटक भाग्यवान लाभार्थी:-(कृषी पंप)  १) श्री अजिनाथ बाबू खराडे २) श्री सदाशिव नामदेव खराडे ३) श्री सुधीर विठ्ठल पाडुळे ४) श्री भैरवनाथ वामन साठे ५) श्री नारायण भाऊ औताडे  अनु जाती जमाती घटक लाभार्थी :-(विप्रो डीलक्स इस्त्री, एन्डडस्लाईट टॉर्च) १) सौ. सुमन पांडुरंग कसबे २) श्रीमती. मंगल महादेव पवार ३) श्री विनोद विजय जगताप ४) श्री धनंजय लक्ष्मण आरडे ५)श्री धनाजी लक्षमण कांबळे ७)श्री भिकाजी बाबू शिंदे ८)श्री चंद्रकांत आण्णा जगताप ९) श्री सुनील महादेव पवार १०)श्री वसंत शिवराम साबळे ११) श्रीम सुलाबाई सहदेव कांबळे १२) श्रीम सुंदरबाई शिवराम साबळे १३) गायकवाड अनुसया रामा  *दिव्यांग घटक मधून श्री विज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा    ऑनलाईन संपन्न केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन इंंदापूर: कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले ,भरतशेठ शहा, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन मा.श्री. कांतीलाल झगडे, ऍ़ड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.     विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.       विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सु...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

कर्मयोगीची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा    ऑनलाईन संपन्न,केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन इंदापूर (21 मार्च) कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन कॉन्फरन्सिंगव्दारे कोरोनाचे सर्व नियम पाळून कारखान्याचे आदरणीय चेअरमन मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसो, यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले ,भरतशेठ शहा, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह. साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन मा.श्री. कांतीलाल झगडे, ऍ़ड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये तसेच सभासदांचे ऑनलाईन उपस्थितीव्दारे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाली.     विषयपञिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी केले. व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.       विषयपञिकेवरील सर्व विषयांचे मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही व...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

धनंजय (बापू) वाशिंबेकर मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने कर्करोग तपासणी निदान शिबीर आयोजित. इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. धनंजय वाशिंबेकर यांच्या ६ व्या पुण्यतिथी निमित्त धनंजय (बापू) वाशिंबेकर मेमोरियल फाऊंडेशन व मैत्रीण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ मार्च रोजी कर्करोग तपासणी निदान व उपचार तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संदीप वाशिंबेकर यांनी दिली.  कर्करोग तपासणी अभियानात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग व पोटाचा कर्करोग यांचे निदान करुन त्यांवर तज्ञांच्या मार्फत योग्य त्या उपचाराबाबत  सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन मेमोरियल फाऊंडेशनचे व्यंकटेश वाशिंबेकर, सोमनाथ खरवडे, अतुल शेटे पाटील, भावेश ओसवाल यांनी केले आहे.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर अर्बन बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या व्दारे संपन्न  इंदापूर :अर्बन बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रविवार दिनांक 21/03/2021 दुपारी ठिक चार वाजता बँकेच्या सभागृहात पार पडली बँकेचे संस्थापक मा. ना.श्री हर्षवर्धन पाटील साहेब व बँकेचे चेअरमन भरतशेठ शहा व्हा. चेअरमन श्री. देवराज जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विजय तावरे साहेब बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली,  सभेतील सर्व विषयांस आॅनलाईन सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली, सभेचे प्रास्ताविक बँकेचे माजी चेअरमन अशोकराव शिंदे यांनी केले,या वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते,हा कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला, 

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नीरा भीमा कारखान्याची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात  - हर्षवर्धन पाटील यांचे सभेला मार्गदर्शन इंदापूर:                     इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथिल निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची सन 2019-20 ची 22 वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आज रविवारी (दि.21) सकाळी 11 वा. उत्साहात व  खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. यासभेला कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभ्यासू असे सविस्तर मार्गदर्शन केले.            देशातील व जगातील साखर उद्योगाचे स्वरूप बदलत चालले आहे. केंद्र सरकारने पाच वर्षासाठी इथेनॉलचे अतिशय चांगले धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यापुढे आगामी काळात साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याची संधी आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात  दिली.        ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जन सामान्यांचे नेते राजवर्धन पाटील यांनी केले सय्यद आणि आवटे कुटूंबियांचे सांत्वन इंदापूर: दि. १८ मार्च २०२१ रोजी कळंब (लक्ष्मीनगर) येथे राहणारे  इस्माईल अली सय्यद व भवानीनगर  येथे राहणारे श्री. बापू बाजीराव आवटे यांच्या मुलांचे काल सोलापूर- विजापूर रस्त्यावर दि. १७ मार्च २०२१ रोजी अपघाताने निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहुन मा.राजवर्धन पाटील यांनी कुटूंबियांचे सांत्वन केले.                   सय्यद यांचा मुलगा पै. सोहेल इस्माईल सय्यद(वय २२) व श्री. बापू बाजीराव आवटे मुलगा कै.महादेव बापू आवटे (वय २०) दोघे ही कब्बडीचे महाराणा संघाचे खेळाडू होते. त्यांचे प्रशिक्षक व खेळाडू राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन कै. महादेव आवटे  व पै. सोहेल सय्यद व यांच्या सह १३ खेळाडू कर्नाटकात बेडगी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डीचे सामने खेळण्यासाठी जात होते. परंतु काळाने घाला घातला, इंदापूर तालुका या दोन गुणवंत खेळाडूंना मुकला. या दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र दुःखाची शोककळा पसरली असून, तरूण मुलांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळह...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाराष्ट्र राज्य जनरल कामगार व औद्योगिक सुरक्षा रक्षक युनियन सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी विष्णू तात्या बिचकुले यांची निवड. इंदापूर: दि.२० महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी व जनरल कामगार औद्योगिक सुरक्षा रक्षक युनियनच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे विष्णू बिचकुले यांची निवड संघटनेचे संस्थापक सरचिटणीस सहजराव पाटील यांनी केले असून त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक जनरल कामगार व सुरक्षा रक्षक युनियन ही संघटना महाराष्ट्रातील विविध औद्योगिक वसाहती साखर कारखाने हमाल व सर्वच कामगारांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारांकडून कामगारांची होणारी पिळवणूक तसेच कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करण्यात येते. विष्णू बिचकुले है चळवळीत काम करणारे व अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक संघटन मध्ये जिद्दीने काम करणारे कार्यकर्ते असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी संघटनेच्या वरिष्ठांनी दिल्या असून आपल्या वरिष्ठांचा विश्वासास पात्र राहुन कष्टकरी कामगारा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

समता सैनिक दलाचे,पुणेजिल्हा अध्यक्ष,अशोकराव पोळ यांना मातृशोक        इंदापूर : कालकथित कमल विठ्ठल पोळ यांचे८१व्या वर्षी  दि. १८/०३/२०२१ रोजी गुरुवारी सकाळी ९ : १५ वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना, बारा नातवंडे, सहा परतुंड असा परिवार असुन समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या त्या मातोश्री होत्या. आयुष्याभर त्या त्यांच्या जीवनातील परिस्थितीशी संघर्ष करत राहिल्या पण कधीचं हार मानली नाही. त्या स्वत: निरक्षर असताना सुद्धा शिक्षणाला खुप महत्व देत होत्या म्हणून त्यांनी त्यांच्या परिस्थिति नुसार मुलांना जेमतेम शिक्षण दिले मात्र नातवंडांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले असून नातवंडांच्या पाठीमागे त्या अज्जी म्हणून खंबिरपणे उभ्या होत्या आज त्याचं आभाळमायेच्या अज्जी हरपल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शिवसेनेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कामास सुरूवात,शिवसेनेचा झटका  इंदापूर - बारामती रस्त्यावरील साईडपट्टया न भरल्याने चार निष्पाप नागरिकांना तसेच २ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर शिवसेनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडे कडे केली असल्याची माहिती तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली,होती  ते म्हणाले की, इंदापूर बारामती रस्त्याचे नुकतेच काम झाले असून ते काम केल्यानंतर संबधित ठेकेदाराने साईडपट्ट्या भरणे गरजेच होते. मात्र ठेकेदाराने साईड पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता १ ते १.५ फुट उचलून आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच ४ निरपराध नागरिकांना तसेच २ जनावरांना आपला जीव गमवावा लागला  असल्याचे सांगून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्ह्याची तक्रार आपल्या खात्यामार्फत दाखल करण्यात यावी तसेच त्वरीत साईडपट्टया भरुन घेण्यात याव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र व उग्र आंदोलन करणा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : इंदापूर तालुका प्रमुख शिवसेना नितीनदादा  शिंदे . इंदापूर - बारामती रस्त्यावरील साईडपट्टया न भरल्याने चार निष्पाप नागरिकांना तसेच २ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर शिवसेनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडे कडे केली असल्याची माहिती तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले की, इंदापूर बारामती रस्त्याचे नुकतेच काम झाले असून ते काम केल्यानंतर संबधित ठेकेदाराने साईडपट्ट्या भरणे गरजेच होते. मात्र ठेकेदाराने साईड पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता १ ते १.५ फुट उचलून आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच ४ निरपराध नागरिकांना तसेच २ जनावरांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे सांगून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्ह्याची तक्रार आपल्या खात्यामार्फत दाखल करण्यात यावी तसेच त्वरीत साईडपट्टया भरुन घेण्यात याव्यात. अन्यथा  शिवसेना स्टाईलने तीव्र व उग्र आंदोलन करणार असल्याचा इ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी मानांककन  इंदापूर:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेला देश पातळीवर सलग चौथ्या वर्षी मानांककन मिळत यावर्षी ओ डी एफ पुष्टीकरण झाल्यामुळे इंदापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता ताई शहा यांनी इंदापूर शहरातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई स्वच्छता उत्कृष्ट पणे ठेवल्याबद्दल त्या ठिकाणी नियुक्त असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यामध्ये राहुल वाघेला दीपक सोलंकी रोहन चव्हाण कुणाल चव्हाण शैलेश सोलंकी सौ.शीतल वाघेला तान सिंग सोलंकी महावीर मिसाळ दिनेश वाघेला   व इतर कर्मचाऱ्यांचा मा. नगराध्यक्ष अंकिताताई शहा व मा. श्री मुकुंद शेठ शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  याप्रसंगी यांच्याबद्दल गौरवोद्गार  काढताना सांगितले कि हे जे इंदापूर नगर परिषदेस मानांकन मिळाले आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या कष्टाचे फळ आहे एवढ्या उन्हा वाऱ्याचे तुम्ही श...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी, - हर्षवर्धन पाटील            इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे काही दिवसांपासून तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नावर अपुरी व दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. मंत्रिपदावर व्यक्तीने कागदपत्रासह वस्तुनिष्ठ माहिती देणे गरजेचे आहे. गेली दीड वर्षे सत्तेवर असताना पोकळ घोषणा करणाऱ्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक थांबवावी, अशी टीका भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) केली .             इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाणी प्रश्नी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे शनिवारी(दि.14) पत्रकार परिषद घेतली. सदर पत्रकार परिषदेत राज्यमंत्र्यांनी दिलेली माहिती कशी दिशाभूल करणारी आहे, हे हर्षवर्धन पाटील यांनी दाखवून दिले.            ते पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी उपसा योजनेसाठी खर्च किती येणार आहे ? अर्थसंकल्पात नक्की किती रक्कमेची तरतूद प्रस्थावित आ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

निराशेपोटी भाजपाच्या तालुक्यातील नेत्यांनी नको त्या वल्गना करू नये-राष्ट्रवादी  इंदापूर:   "हर घर जल ही योजना काय आहे? तिची रचना काय आहे? याचा अभ्यास या भाजपचा विद्वान मंडळींनी करावा व नंतर टीकाटिप्पणी करावी. तुमच्या कर्तृत्वहीन नेतृत्वामुळे या तालुक्यातील हुशार मतदाराने तुम्हाला दोन वेळा घरी बसवून देखील तुम्ही अशा हुशार कि च्या बाता कशा मारता हा सवाल या तालुक्यातील सूज्ञ जनतेला पडतो.नीरा देवधरचे पाणी भाजपच्या काळात एका खासदाराच्या सांगण्यावरून नजीकच्या जिल्ह्यात वळवले होते त्याचा परिणाम कायमस्वरूपी इंदापूर तालुक्यातील शेतीला होणार होता त्या पाण्याचे कायदेशीर बाबी तपासून पहिल्याच अधिवेशनात इंदापूरला नीरा डावा कालवा मध्ये पहिल्या प्रमाणात पुन्हा तेवढेच पाणी मंजूर केले त्याबाबत तुम्ही कधी बोलला नाहीत हाच तुमचा दुटप्पीपणा. विकास काय असतो आणि तो कसा केला पाहिजे तो रक्ता मध्ये कशा पद्धतीने भिनलेला असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या राज्याचे मंत्री नामदार दत्तामामा भरणे होय . मामा तालुक्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणत आहेत आणि कुठेतरी नैराश्य पोठी न बघवल्यासरखे आ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन आणि कै. शंकरराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सायकल क्लब चे अभिवादन  इंदापूर:  छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन आणि कै शंकरराव भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त गलांड वाडी नंबर-1 येथे इंदापूर सायकल क्लब चे सदस्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले, सायकल क्लब सदस्य आणि युवा क्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांचा वाढदिवस गलांडवाडी येथे छत्रपती संभाजी राजे यांचे समोर सायकल क्लब सदस्य भगवान दादा महाडिक आणि फलफले सर आणि मित्रपरिवार यांच्या वतीने साजरा करण्यात आला, सायकल क्लब चे दशरथ भोंग,प्रशांत शिताप ,अस्लम शेख ,समीर विंचू, शैलेश गलांडे ,ज्ञानदेव डोंगरे ,उमेश राऊत ,महेबूब मोमीन ,अनिल घेरडे, सचिन चव्हाण, सिद्धार्थ वाघमारे, अनिल जाधव ,तुकाराम बानकर, डॉ प्रकाश फलफले या सदस्यांनी सायकलिंग करून संभाजी राजे यांना वंदन केले.   सायकल क्लब सदस्य भगवान महाडिक यांनी आणि फलफले सर यांनी गलांडवाडी 1 मध्ये सर्व इंदापूर सायकल सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

साखरेची विक्री किंमत रू.3400 करावी,मा.ना. रावसाहेब दानवेशी चर्चा केंद्र सरकार सकारात्मक-हर्षवर्धन पाटील  इंदापूर:           केंद्र सरकारने साखरेची किमान  विक्री किंमत (एमएसपी ) तात्काळ रू.3400 करावी, साखरेच्या लवकर निर्यातीसाठी पुरेशा संख्येने मालवाहू जहाज उपलब्ध करून द्यावेत, आदी साखर उद्योगासंदर्भातील मागण्या भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे नवी दिल्ली येथे मंगळवारी (दि.9) भेट घेऊन केल्या. यावेळी मंत्री दानवे यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगातील विविध विषयांवरती चर्चा केली व केंद्र सरकारने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी मदत करावी, अशी प्रगतीसाठीमागणी केली.        दरम्यान, साखरेची एमएसपी वाढविण्याच्या प्रस्ताव हा सध्या प्रक्रियेत असून साखर उद्योगातील इतर मागण्यासंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी चर्चेत स्पष्ट केले.           ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

भिमाई आश्रमशाळेत बहुजन महामातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महिला दिन साजरा ..                         इंदापूर:येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने (दि.८) जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते, त्याप्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे मॅडम  बोलत होत्या .त्या म्हणाल्या की,प्रत्येकाच्याच  जीवनात असणाऱ्या महिलांच्या योगदानाला आणि स्रीत्वाला साजरा करण्याच्या अनुषंगाने महिला दिनाचे विशेष महत्व असल्याने साजरा करण्यात येतो. आपल्या घरातून ते  देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे.या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रती आदर व्यक्त करतात.असे प्राचार्या अनिता साळवे मॅडम कार्यक्रमा प्रसंगी म्हणाल्या.यावेळी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते बहुजन महामातांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्राचार्यांच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांचा येथोचीत सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास उ...

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

 निंबाळकर यांच्या गोट्याला लाईटच्या शाॅर्टसर्किट मुळेआग,जि.प.सदस्य अभिजीत तांबिले यांनी केली पहाणी  देेेेणार मदतीचा हात  इंदापूर तालुक्यातील  काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघामधिल वडापुरी येथिल शेतकरी गोंविद निंबाळकर यांच्या घराला चिकटवून असलेल्या गुराच्या गोट्याला लाईटच्या शाॅर्टसर्किट मुळे भर दुपारी आग लागली.ही आग इतकी भिषण होती की या आगिमध्ये चार गायी, एक म्हैस,दोन कालवड,एक गाबन गाय यांचा आगिमध्ये होरपळून मृत्यु झाला. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांना  ही घटना समजताच घटनास्थळी लगेच धाव घेतली व पहाणी करत लगेच गांवचे पोलीस पाटिल महेंश नलवडे,इंदापूर तालूका पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डाॅ.राम शिंदे व त्यांची पशुसंवर्धन विभागाची सर्व टिम यांना तातडीने बोलावून वाचलेल्या गायी व म्हैस  यांच्यावर तातडीचे प्रथम उपचार करण्याच्या सुचना देऊन लगेच तहसिल कार्यालयाची व पोलिस प्रशासन व लाईट बोर्डाचे अधिकारी यांना पुढील कर्यवाही करण्यास सांगून प्रशासकिय मदत मिळण्यासाठी पंचनामे करून घेतले. निंबा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी, हिंगणगाव, शहा या गावातील कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन इंदापूर:शरदचंद्र पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने इंदापूर तालुक्यात च नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात विकासाची गंगा आली आहे,ते ग्रामीण भागात पोहचवणे गरजेचे आहे, म्हणून या वेळी इंदापूर तालुक्यातील,सरडेवस्ती ते शहा महादेव नगर रस्ता, रविंद्र देवकर वस्ती  येथे दत्त मंदिराचे  सभा मंडप बांधणे ,आसबे वस्ती येथील अंतर्गत रस्ता करणे हि सर्व कामांचे निवेदन या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे  वसंतराव आरडे,सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे जिल्हा,इंदापूर तालुका अध्यक्ष हणुमंतराव कोकाटे,नवनाथ रूपनवर, शिंदे सर,  शहा गावचे  सरपंच विष्णू पाटील,शुभम निंबाळकर  इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी वसंतराव आरडे म्हणाले की राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना निवेदन देताच आपण दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

वंचित बहुजन आघाडीचे तहसिलसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. इंदापूर : केंद्र सरकारने पारित केलेले नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असून सदरील कायदे तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि.५) रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सदरील कृषी कायदे हे चुकीचे व शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. त्यामुळे कायदे तात्काळ रद्द होणे गरजेचे असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत असल्याचे यावेळी शहराध्यक्ष हणुमंत तात्या कांबळे  यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्षा राणी कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हणुमंत कांबळे, प्रमोद चव्हाण, सागर लोंढे, निहाल गायकवाड, इलाही शेख, रोहित मोहिते, अमोल भोसले, उमेश खरात, योगेश चव्हाण व आदी पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.