इंदापूर :
इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष स्व. धनंजय वाशिंबेकर यांच्या ६ व्या पुण्यतिथी निमित्त धनंजय (बापू) वाशिंबेकर मेमोरियल फाऊंडेशन व मैत्रीण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २४ मार्च रोजी कर्करोग तपासणी निदान व उपचार तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संदीप वाशिंबेकर यांनी दिली.
कर्करोग तपासणी अभियानात स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग व पोटाचा कर्करोग यांचे निदान करुन त्यांवर तज्ञांच्या मार्फत योग्य त्या उपचाराबाबत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे.
या शिबिराचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन मेमोरियल फाऊंडेशनचे व्यंकटेश वाशिंबेकर, सोमनाथ खरवडे, अतुल शेटे पाटील, भावेश ओसवाल यांनी केले आहे.
टिप्पण्या