शिवसेनेच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कामास सुरूवात,शिवसेनेचा झटका
इंदापूर - बारामती रस्त्यावरील साईडपट्टया न भरल्याने चार निष्पाप नागरिकांना तसेच २ जनावरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इंदापूर शिवसेनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडे कडे केली असल्याची माहिती तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली,होतीअसल्याचे सांगून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्ह्याची तक्रार आपल्या खात्यामार्फत दाखल करण्यात यावी तसेच त्वरीत साईडपट्टया भरुन घेण्यात याव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र व उग्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितले होते, प्रशासनातील अधिकारी यांनी शिवसेनाच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लगेच सणसर परिसरात साईट पट्या भरण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे, याला म्हणतात शिवसेनेचा झटका,
टिप्पण्या