इंदापूर : कालकथित कमल विठ्ठल पोळ यांचे८१व्या वर्षी दि. १८/०३/२०२१ रोजी गुरुवारी सकाळी ९ : १५ वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन सुना, बारा नातवंडे, सहा परतुंड असा परिवार असुन समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या त्या मातोश्री होत्या. आयुष्याभर त्या त्यांच्या जीवनातील परिस्थितीशी संघर्ष करत राहिल्या पण कधीचं हार मानली नाही. त्या स्वत: निरक्षर असताना सुद्धा शिक्षणाला खुप महत्व देत होत्या म्हणून त्यांनी त्यांच्या परिस्थिति नुसार मुलांना जेमतेम शिक्षण दिले मात्र नातवंडांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले असून नातवंडांच्या पाठीमागे त्या अज्जी म्हणून खंबिरपणे उभ्या होत्या आज त्याचं आभाळमायेच्या अज्जी हरपल्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या