इंदापूर :तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमिपूजन व उद्घाटन बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद गटामध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले,
बाभूळगाव पाटी ते भांडगाव या रस्त्याचे भुमी पुजन वसंतराव आरडे सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, यांच्या हस्ते पार पडले ,या वेळी विष्णू पाटील सरपंच शहा,माजी सरपंच संजय देवकर, सुभाष डरंगे, शिवाजीराव जगताप,मनोहर भोसले ,माजी सरपंच भाटनिमगाव, काकासाहेब खबाले, महादेव मिसाळ,हौसराव चव्हाण,गौतम देवकर, आबा पाटील, नितीन पाटील,लहु गवळी,उपस्थित होते, यावेळी आरडे म्हणाले की, कार्यकर्ते आणी सामान्य जनतेला मान सन्मानाची वागणूकफक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच मिळते,त्याचे उदाहरण म्हणजे, तीन कोटी रुपयांच्या कामांचे भुमी पुजन फक्त कार्यकर्ते आणी जनता मिळून च केले, विरोधी पक्षातील हर्षवर्धन पाटील यांच्या वर टिका करताना आरडे म्हणाले की सध्या घरी जनतेने बसवलेल्या माजी लोकप्रतिनिधीने दुस-याच्या कामाचे श्रेय घेऊ नये, तुमचे नाक कापलं तरी,अजून आहेच म्हणताय आसेही वागणं बरे नाही आसे आरडे म्हणाले,
टिप्पण्या