इंदापूर : केंद्र सरकारने पारित केलेले नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असून सदरील कायदे तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि.५) रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सदरील कृषी कायदे हे चुकीचे व शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. त्यामुळे कायदे तात्काळ रद्द होणे गरजेचे असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचीत बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत असल्याचे यावेळी शहराध्यक्ष हणुमंत तात्या कांबळे यांनी सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुकाध्यक्षा राणी कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हणुमंत कांबळे, प्रमोद चव्हाण, सागर लोंढे, निहाल गायकवाड, इलाही शेख, रोहित मोहिते, अमोल भोसले, उमेश खरात, योगेश चव्हाण व आदी पदाधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या