निंबाळकर यांच्या गोट्याला लाईटच्या शाॅर्टसर्किट मुळेआग,जि.प.सदस्य अभिजीत तांबिले यांनी केली पहाणी देेेेणार मदतीचा हात
इंदापूर तालुक्यातील काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघामधिल वडापुरी येथिल शेतकरी गोंविद निंबाळकर यांच्या घराला चिकटवून असलेल्या गुराच्या गोट्याला लाईटच्या शाॅर्टसर्किट मुळे भर दुपारी आग लागली.ही आग इतकी भिषण होती की या आगिमध्ये चार गायी, एक म्हैस,दोन कालवड,एक गाबन गाय यांचा आगिमध्ये होरपळून मृत्यु झाला.
जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांना ही घटना समजताच घटनास्थळी लगेच धाव घेतली व पहाणी करत लगेच गांवचे पोलीस पाटिल महेंश नलवडे,इंदापूर तालूका पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डाॅ.राम शिंदे व त्यांची पशुसंवर्धन विभागाची सर्व टिम यांना तातडीने बोलावून वाचलेल्या गायी व म्हैस
यांच्यावर तातडीचे प्रथम उपचार करण्याच्या सुचना देऊन लगेच तहसिल कार्यालयाची व पोलिस प्रशासन व लाईट बोर्डाचे अधिकारी यांना पुढील कर्यवाही करण्यास सांगून प्रशासकिय मदत मिळण्यासाठी पंचनामे करून घेतले.
निंबाळकर कुटूंबाचे सहा ते सात लाखांचे या संकंटामुळे नुकसान झाले आहे. यामुळे आर्थिक हानी सुध्दा मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे.याचे आम्हाला सुध्दा खूप दुःख आहे.या निमीत्ताने जिल्हा परिषद मतादार संघाचे सदस्य अभिजीत भैय्या तांबिले म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम राज्य मंत्री मा.ना.दत्तात्रय मामा भरणे यांना वडापुरी येथिल निंबाळकर कुटूंबियांना जास्तित जास्त शासन मदत मिळवून देण्यासाठी साकडे घालणार आहे.
टिप्पण्या