इंदापूर: छत्रपती संभाजी राजे बलिदान दिन आणि कै शंकरराव भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त गलांड वाडी नंबर-1 येथे इंदापूर सायकल क्लब चे सदस्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले,
सायकल क्लब सदस्य आणि युवा क्रांती प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांचा वाढदिवस गलांडवाडी येथे छत्रपती संभाजी राजे यांचे समोर सायकल क्लब सदस्य भगवान दादा महाडिक आणि फलफले सर आणि मित्रपरिवार यांच्या वतीने साजरा करण्यात आला, सायकल क्लब चे दशरथ भोंग,प्रशांत शिताप ,अस्लम शेख ,समीर विंचू, शैलेश गलांडे ,ज्ञानदेव डोंगरे ,उमेश राऊत ,महेबूब मोमीन ,अनिल घेरडे, सचिन चव्हाण, सिद्धार्थ वाघमारे, अनिल जाधव ,तुकाराम बानकर, डॉ प्रकाश फलफले या सदस्यांनी सायकलिंग करून संभाजी राजे यांना वंदन केले.
सायकल क्लब सदस्य भगवान महाडिक यांनी आणि फलफले सर यांनी गलांडवाडी 1 मध्ये सर्व इंदापूर सायकल सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले
टिप्पण्या