मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

निराशेपोटी भाजपाच्या तालुक्यातील नेत्यांनी नको त्या वल्गना करू नये-राष्ट्रवादी 

इंदापूर:   "हर घर जल ही योजना काय आहे? तिची रचना काय आहे? याचा अभ्यास या भाजपचा विद्वान मंडळींनी करावा व नंतर टीकाटिप्पणी करावी. तुमच्या कर्तृत्वहीन नेतृत्वामुळे या तालुक्यातील हुशार मतदाराने तुम्हाला दोन वेळा घरी बसवून देखील तुम्ही अशा हुशार कि च्या बाता कशा मारता हा सवाल या तालुक्यातील सूज्ञ जनतेला पडतो.नीरा देवधरचे पाणी भाजपच्या काळात एका खासदाराच्या सांगण्यावरून नजीकच्या जिल्ह्यात वळवले होते त्याचा परिणाम कायमस्वरूपी इंदापूर तालुक्यातील शेतीला होणार होता त्या पाण्याचे कायदेशीर बाबी तपासून पहिल्याच अधिवेशनात इंदापूरला नीरा डावा कालवा मध्ये पहिल्या प्रमाणात पुन्हा तेवढेच पाणी मंजूर केले त्याबाबत तुम्ही कधी बोलला नाहीत हाच तुमचा दुटप्पीपणा. विकास काय असतो आणि तो कसा केला पाहिजे तो रक्ता मध्ये कशा पद्धतीने भिनलेला असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे या राज्याचे मंत्री नामदार दत्तामामा भरणे होय . मामा तालुक्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणत आहेत आणि कुठेतरी नैराश्य पोठी न बघवल्यासरखे आपण अभ्यास न करता टीकाटिप्पणी करत आहात याच्यावरून आपल्या बालिश बुद्धीचे दर्शन इंदापूरच्या जनतेला होत आहे. हर घर जल ही योजना राज्य शासनाचे जल जीवन मिशन या नावाने कार्यान्वित आहे. जल जीवन मिशन योजना राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे राबविण्यात येते याचे नियोजन राज्य शासनाच्या वतीने करून ते मंजूर केले जाते.हर घर जल योजनेमध्ये केंद्र शासन 50 टक्के राज्य शासन 50 टक्के असे समान निधीचे वाटप असते. यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती नेमली जाते या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री असतात व त्या जिल्ह्यातील आमदार व खासदार त्याचे सदस्य असतात या कमिटीच्या माध्यमातून या योजनेचा आराखडा तयार केला जातो व तो मंजुर केला जातो. म्हणून या कमिटीमध्ये मामांनी हा आराखडा मांडून या तालुक्यासाठी मंजूर करून घेतला आहे हे एवढं चांगलं काम करून देखील आपण त्या कामाला गालबोट लावण्याचे काम करत आहात हे तुम्हाला चांगले काम बघवत नाही म्हणून असे नैराश्याने बोलता हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहात नाही. भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणतात की नको त्या विकासकामांची घोषणा राज्य मंत्री करतात अरे तुमच्या डोळ्यावरचा चष्मा बदला म्हणजे तुम्हाला सर्व काही चांगलं दिसेल अध्यक्षांच्या बेलवाडी गावामध्ये जी विकास कामे चालू आहेत ती तरी तुम्ही उघड्या डोळ्याने मान्य करा.बावडा गावांमध्ये तुमच्या वेगवेगळे विकास कामे चालू आहेत ती तरी उघड्या डोळ्यांनी बघा.मागील वीस वर्षात विकासाच्या मुद्द्यावर गप्पा मारून तुम्ही तालुक्याचे खोटं राजकारण केलं म्हणून का तुमच्या नेतृत्वाला जनतेने घरी बसवलं हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही. खोट बोल पण रेटून बोल ती तुमची संस्कृती आणि तुम्ही आमच्या कर्तुत्वान नेतृत्वावर टीका करता हे का तुमचं विद्वान पण? ग्रामपंचायत सरपंच निवडीवरून देखील तुम्ही खोटं बोललाततिथे देखील तुमचा खोटेपणा आम्ही जनतेपुढे उघड केला तेव्हा कुठे तुम्ही गप्प बसला.येणाऱ्या काळामध्ये जी होणारी विकास कामे आहेत ती विकास कामे बघून नक्कीच तुमचं तोंड बंद झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून खोटे व बिनबुडाचे आरोप करू नका. येणाऱ्या काळामध्ये राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचे विकास कामाचे माणस आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो हे ऐकूनच तुमचं तोंड बंद होईल.तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लाकडी लिंबोडी उपसा जलसिंचन योजना, शेटफळगडे उपसा जलसिंचन योजना, उजनी धरणातील बुडीत बंधारे, नीरा नदीवरील बंधारे , भाटनिमगाव चे बंधारे, खोरोची मधील बंधारे शेटफळ तलावाची उंची वाढवणे या कामासाठी सर्वस्वी प्रयत्न करून खूप मोठ्या प्रमाणात निधी इंदापूर तालुक्याचा आणण्याचा मानस या नेतृत्वाचा आहे.इंदापूर तालुक्यातील रस्ते चकाचक होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या रस्त्यावरून जात _येत असताना देखील तुम्हाला विकास दिसत नाही ही शोकांतिका आहे त्यावेळी  तुम्ही तर तुमची नैतिकता विसरु नका जे सत्य आहे ते स्वीकारा असेआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे कार्याध्यक्ष अतुल (शेठ) झगडे तालुका उपाध्यक्ष नवनाथ  रूपनवर, जिल्हा सरचिटणीस शिंदे सर यांनी भाजपाच्या स्वयंघोषित विद्वान मंडळींना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते