इंदापूर:शरदचंद्र पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने इंदापूर तालुक्यात च नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात विकासाची गंगा आली आहे,ते ग्रामीण भागात पोहचवणे गरजेचे आहे, म्हणून या वेळी इंदापूर तालुक्यातील,सरडेवस्ती ते शहा महादेव नगर रस्ता, रविंद्र देवकर वस्ती येथे दत्त मंदिराचे सभा मंडप बांधणे ,आसबे वस्ती येथील अंतर्गत रस्ता करणे हि सर्व कामांचे निवेदन या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे वसंतराव आरडे,सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे जिल्हा,इंदापूर तालुका अध्यक्ष हणुमंतराव कोकाटे,नवनाथ रूपनवर, शिंदे सर, शहा गावचे सरपंच विष्णू पाटील,शुभम निंबाळकर इतर कार्यकर्ते उपस्थित होते,
या वेळी वसंतराव आरडे म्हणाले की राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना निवेदन देताच आपण दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरच पाठपुरावा करून, निधी उपलब्ध करून दिला जाईल,तालुक्यातील कोणत्याही कामाला निधी तात्काळ उपलब्ध करून देणार आसेही दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले आसल्याची माहिती वसंतराव आरडे यांनी दिली,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या