इंदापूर: दि. १८ मार्च २०२१ रोजी कळंब (लक्ष्मीनगर) येथे राहणारे इस्माईल अली सय्यद व भवानीनगर येथे राहणारे श्री. बापू बाजीराव आवटे यांच्या मुलांचे काल सोलापूर- विजापूर रस्त्यावर दि. १७ मार्च २०२१ रोजी अपघाताने निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहुन मा.राजवर्धन पाटील यांनी कुटूंबियांचे सांत्वन केले.
सय्यद यांचा मुलगा पै. सोहेल इस्माईल सय्यद(वय २२) व श्री. बापू बाजीराव आवटे मुलगा कै.महादेव बापू आवटे (वय २०) दोघे ही कब्बडीचे महाराणा संघाचे खेळाडू होते. त्यांचे प्रशिक्षक व खेळाडू राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन कै. महादेव आवटे व पै. सोहेल सय्यद व यांच्या सह १३ खेळाडू कर्नाटकात बेडगी या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डीचे सामने खेळण्यासाठी जात होते. परंतु काळाने घाला घातला, इंदापूर तालुका या दोन गुणवंत खेळाडूंना मुकला. या दोघांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे सर्वत्र दुःखाची शोककळा पसरली असून, तरूण मुलांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. *या दु:खातून सय्यद आणि आवटे परिवार बाहेर यावेत, त्यांना परमेश्वराने त्यासाठी शक्ती द्यावी*,अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून नीरा भीमा कारखान्याचे संचालक *मा. राजवर्धनदादा पाटील यांनी करून अत्यंत शोकाकुल वातावरणात कै. महादेव आवटे व पैगंबरवासी सोहेल सय्यद यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली
टिप्पण्या