इंदापूर :अर्बन बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रविवार दिनांक 21/03/2021 दुपारी ठिक चार वाजता बँकेच्या सभागृहात पार पडली बँकेचे संस्थापक मा. ना.श्री हर्षवर्धन पाटील साहेब व बँकेचे चेअरमन भरतशेठ शहा व्हा. चेअरमन श्री. देवराज जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विजय तावरे साहेब बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली,
सभेतील सर्व विषयांस आॅनलाईन सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली, सभेचे प्रास्ताविक बँकेचे माजी चेअरमन अशोकराव शिंदे यांनी केले,या वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते,हा कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या