प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कोविड योद्धांचा सन्मान . इंदापूर :प्रहार जनशक्ती पक्ष इंदापूर तालुका यांच्या वतीने कोरोना कालावधीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार यांना 'कोविड योद्धा ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. ३१ रोजी पंचायत समितीच्या कै. शंकररावजी पाटील सभागृहामध्ये या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निरज कडू - पाटील, महेश कनकुरे, पंकज बगाडे, प्रहारच्या पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा मीना धोत्रे, ए. आर. फौंडेशनचे अध्यक्ष राम गायकवाड, यांच्या हस्ते डॉक्टर, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वाॅर्ड बाॅय, ग्रामसुरक्षा कर्मचारी यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील कोविड रुग्णांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायजर, फळे यांचे वाटप करण्यात आले. तसेच अंध, अपंग,...
SHIVSRUSTHI NEWS