मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर:  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक पदासाठी 08 जानेवारी 2021 ते
14 जानेवारी 2021 या कालावधीमध्ये झालेल्या प्राध्यापक पदाच्या पदोन्नती साठी घेण्यात आलेल्या
मुलाखती मध्ये मोठ्या प्रमाणात पात्रता धारक  प्राध्यापकांना नाकारण्यात आले आहे  
  युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक नियमानुसार
प्राध्यापक पदाच्या मुलाखती महाविद्यालयात घेणे अपेक्षित असताना विद्यापीठाने सदर 
मुलाखती विद्यापीठ स्तरावर आयोजित करून हा कॅम्प घेतला. विद्यापीठ अनुदान
आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी  प्राध्यापकांचा अकॅडेमीक परफॉर्मन्स इंडिकेटर (ए पी आय ) कमीत कमी 110  असावा आणि युजीसी केअरलिस्ट जर्नलमध्ये तीन रिसर्च पेपर असावेत. प्राध्यापक पदासाठी मुलाखत कमिटीचे प्रमुख हे संस्था प्रतिनिधी असणे अपेक्षित असताना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करून कमिट्या स्थापन केल्या, कुलगुरू प्रतिनिधी आणि
विषयतज्ञ यांना प्राधान्य देऊन संस्थाचालक प्रतिनिधी यांना दुय्यम स्थान दिले गेले. यामध्ये  
महाविद्यालयात केलेल्या
कामाचा आणि संशोधन कामाचा विचार न करता काही गुणवत्ताधारक
प्राध्यापकांना कुलगुरू प्रतिनिधी,विषय तज्ञाच्या व्यक्तिद्वेश, मनमानीपणामुळे गुणवत्ताधारक आणि प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या 50% प्राध्यापकांना नाकारण्यात आलेले आहे. त्यामुळे  युजीसी आणि
महाराष्ट्र सरकारच्या नियमाचे  उल्लंघन करून 
मुलाखती घेताना  गुणवत्ताधारक आणि प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या प्राध्यापकांना नाकारून त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्याचा अवमान केला आहे आशा आशयाचे निवेदन प्रा.डाॅ. जयश्री गटकुळ यांनी दिले असल्याचे ते म्हणाले, यावेळी त्या म्हणाल्या की एका प्राध्यापकाचा (ए पी आय ) 679 आणि त्यांचे 08 विदयार्थी पी एच डी आणि 12 एम फिल झालेले असताना त्यांना नाकारले आहे, प्राध्यापकांचे फक्त दोन रिसर्च पेपर होते आणि एक पेपर कॉन्फरन्समध्ये पब्लिश केलेला होता अशा प्राध्यापकांना हितसंबंध जोपासून प्राध्यापक पदासाठी पात्र करण्यात आले आहे,काही प्राध्यापकांना जाणिवपूर्वक कोणत्याही विषयावर प्रश्न विचारण्यात आले काही प्राध्यापकाचे मुल्यांकन फक्त
दोन प्रश्न विचारून केले जात होते, काही प्राध्यापकाना प्राचार्यांच्या नकारार्थी भूमिकेमुळे जाणीवपूर्वक नाकारले आहे यातून व्यक्तीद्वेष, पैशाची देवाघेवाण केले असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. दिनांक 12 जानेवारीला गटकुळ यांनी  प्रोफेसर पदासाठी पुणे विद्यापीठात मुलाखत दिली, विषयतज्ञ यांनी रिसर्च बाबत प्रश्न विचारले यासंदर्भात समाधानकारक मुलाखत झाली, मी रसायनशास्त्र विभागप्रमुख असताना नॅकचे काम उत्कृष्ट पद्धतीने करून   आणि विद्यार्थ्यासाठी जयश्री गटकुळ यांनी  संस्था रजिस्टर करून शैक्षणिक संकुल उभे करून गरीब विद्यार्थी यांना मोफत शिक्षण देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून चालू आहे, पाच ते सहा विद्यार्थी परदेशात शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करत असताना आणि माझे आयुष्य विद्यार्थ्यासाठी वाहून घेतले असताना देखील, लर्निग मेथोड/एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटी/विद्यार्थ्यासाठी योगदान अशा घटकासाठी मुल्यांकन तक्ता असून देखील यासंदर्भात एकही प्रश्न न विचारता किंवा मुलाखत दरम्यान गटकुळ यांची फाईल उघडली देखील नाही असे असताना निवड समितीने यासंदर्भात 50 मार्क पैकी मूल्यांकन करून कोणत्या आधारे गटकुळ यांना फक्त 10 मार्क्स दिले आहेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे. प्राचार्य संजय चाकणे यांनी  कॉलेजमध्ये संकुचित मनोवृती, मनमानीपणा, बेजबाबदार वर्तन, द्वेष मत्सर भावनेतून गटकुळ यांना नेहमीच मानसिक त्रास दिला आहे यासंदर्भात संस्थेला पत्र देऊन सांगितले आहे,सर्वात जास्त संशोधनाचे काम  असून देखील जाणीवपूर्वक इतर प्राध्यापकांकडून लाच घेउन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन समिती सदस्य पदाचा गैरवापर करून निवड समितीला वेटीस धरून माझ्या कॉलेजमधील इतर प्राध्यापकांना प्राध्यापकपद निवडीमध्ये पात्र ठरवून पदोन्नती देण्यात भाग पाडले आहे, माझे एकुण 21रिसर्च पेपर्स (वैयक्तिक) सहा रिसर्च प्रोजेक्ट , ए पी आय - 204, सलग चार वर्षे 2013-2016 दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च कॉम्पेटीशन (आविष्कार) अंतर्गत टीम मॅनेजर म्हणून कार्यरत राहून विद्यापीठाला नॅशनल/स्टेट लेवल अवॉर्ड मिळवून दिले आहेत,2010-2016 दरम्यान एकूण सहा रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले, इंटरनॅशनल/नॅशनल कॉन्फरन्स 50हुन अधिक कॉन्फरन्स मध्ये उपस्थित राहून  शोधनिबंध वाचन केले, आविष्कार संशोधन स्पर्धेत गटकुळ यांनी  सलग चार वेळा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले म्हणून पुणे विद्यापीठाने माझा चार वेळा सन्मान केला आहे, परंतु  प्राचार्य  संजय चाकणे यांनी द्वेशमत्सर भावनेतून निवड समिती सदस्य यांच्यावर दबाव निर्माण करून मला प्राध्यापक पदासाठी रिजेक्ट करण्यास भाग पाडून माझे रिसर्च काम नाही असे सांगणाऱ्या निवड समितीने माझी फाईल पाहण्याचे देखील कष्ट घेतले नाही ही वस्तुस्थिती भयानक आणि गंभीर स्वरूपाची असून शिक्षणक्षेत्रात गुणवत्ताधारक प्राध्यापकांना नाउमेद करणारी आहे सदर मुलाखती चा रिझल्ट  प्राचार्यांनी स्वतःकडे ठेवला होता आणि दहा दिवसानंतर उशिरा रिझल्ट गटकुळ यांना देण्यात आला आसल्याची माहीती जयश्री गटकुळ यांनी  पत्रकारांना दिली,यावेळी त्या म्हणाल्या की 
प्राचार्य आणि निवड समितीने घेतलेल्या अशा बेजबाबदार भुमिकाबाबत मा. कुलगुरू यांनी त्वरित दखल घ्यावी आशी मागणी प्रा.डॉ.जयश्री भास्कर गटकुळ,इंदापूर jayashrigatkul@yahoo.com
यांनी नुकतेच निवेदनाद्वारे  दिली आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते