माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या पर्यावरणीय महत्त्व दर्शवणारी कलाकृती करणा-या कलेेचा सन्मान
इंदापूर: महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या राज्यामध्ये माझी वसुंधरा हे अभियान सुरु असून या उपक्रमांतर्गत इंदापूर शहराच्या पर्यावरणीय संवर्धनाच्या वाढीसाठी इंदापूर नगरपरिषदेने नागरिकासाठी उत्तरायन सप्ताह स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांचा इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले 17 ते 23 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत उपक्रमांमध्ये पर्यावरणीय जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धन यावर लक्ष केंद्रित करून लोकसहभागातून पर्यावरणातील शाश्वत विकास प्रति प्रयत्न केला आहे. या उत्तरायन सप्ताहात भूमी, जल, वायू, अग्नी ,आकाश या पंच महातत्वावर आधारित घटकांचे पर्यावरणीय महत्त्व दर्शवणारी कलाकृती सादरीकरण करणे आवश्यक होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पाच हजार, दुतीय क्रमांक तीन हजार आणि तृतीय क्रमांक पाच दोन हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत एका छोटेखानी कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा.सौ. अंकिता शहा तसेच मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,उपाध्यक्ष मा.श्री धनंजय पाटील, व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विजेत्यांचे नाव घटका नुसार पृथ्वी - १ ) नागेश राम केंगार २) दर्शन धनंजय दळवी ३ ) विनय अशोक कचरे, वायू -१ ) वैष्णव प्रमोद धांगेकर २ ) ऐश्वर्या सुरेश शिंदे ३ ) श्रद्धा सौदागर गोडसे, जल -१ ) हसिबा शमशेर शिकलकर २ ) सागर शिंदे ३ ) राजेस्वी जाधव, अग्नी -१ ) अंकित दीपक चव्हाण २ ) स्नेहल संतोष साबळे ३ ) बाबासाहेब रामचंद्र भोंग
यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक व इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरतशेठ शहा, गटनेते कैलास कदम, नगरसेविका सुवर्णा मुखरे, मीना मोमीन, राजश्री मखरे, हेमलता मालुंजकर विशाल बोंद्रे, महादेव सोमवंशी, जावेद शेख, हमीद आत्तार, धीरज शहा ,सचिन जामदार, इंदापूर अर्बन बँकेचे चे संचालक दादासाहेब पिसे, सागर गाणबोटे, सायरा आत्तार, गुड्डू मोमीन, नितीन मखरे, ललेंद्र शिंदे उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्रद्धा वळवडे यांनी केले. वर्षा क्षीरसागर यांनी आभार मानले. तत्पूर्वी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन नगरपरिषद कार्यालयासमोरील प्रांगणात माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांना वसुंधरेची शपथ देण्यात आली.
टिप्पण्या