इंदापूर:जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण नं 1येथे भारतीय प्रजासत्ताक दिन (दि.२६) सकाळी ठीक ८:२५ वा उत्साहात साजरा झाला. आणि श्रीमती छाया भोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ जयश्री गटकुळ यांनी आजची शिक्षित पिढी समाजपरिवर्तन घडवू शकते या युवा पिढी ला घडविण्याचे कार्य शिक्षक करतात म्हणून समाजपरिवर्तन आणि देशाची क्रांती घडवून आणण्याचे कार्य गुरु शिष्य करत असतात गुरु म्हणून कर्तव्यदक्षता, विद्वता, नैतिकता, प्रामाणिकता ही अनमोल मूल्य शिक्षकांना जपायची असतात. जिजाऊ इन्स्टिट्यूट मध्ये नाविण्यपूरक काम करणाऱ्या माझ्या शिक्षकाबाबत मला सार्थ अभिमान वाटतो* या शब्दात मनोगत व्यक्त केले ध्वजारोहण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रा. सागर उमरे प्रा. अर्चना शिंदे प्रा.प्रातिक्षा शेजाळ प्रा. ज्योती डोंगरे, विश्र्वाबाला गटकुळ, शिवानी गटकुळ आणि संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कोविड- १९चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर वापरण्यात आले. सामाजिक शारीरिक अंतर पाळण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन कार्यक्रमावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रम जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या राजश्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षदा करे आणि साक्षी करे यांनी केले.उपस्थितांचे आभार सागर उंबरे यांनी मानले.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या