इंदापूर: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझी वसुंधरा अभियान अंतर्गत इंदापूर नगर परिषदेने शहरात विविध ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड तसेच ई बाइक साठी संप पंप हाऊस लगत मोफत चार्जिंग स्टेशन शंभर फुटी रोड लगत निर्माण केलेली बायोडायव्हर्सिटी, भार्गवराम बगीच्या भरव्यावर नव्याने 5000 वृक्षांची केलेली लागवड, टाऊन हॉल पाठीमागील बाजूस निर्माण केलेले अटल आनंद घनवन, टेलिफोन ऑफिस ते भारती टॉवर याठिकाणी लावलेले वृक्ष, संविधान चौक ते तापी चौक शंभर फुटी रोड दुतर्फा बाजूस केलेला सायकल ट्रॅक व इतर कामांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत पोर्टल वरती महाराष्ट्र राज्यामध्ये या आठवड्यात इंदापूर नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याची दखल शासनाने घेऊन इंदापूर नगर परिषदेचा सन्मान केला
याबाबत शासनाच्या फेसबुक पोर्टल वरील पोस्ट पाहून पाणी फाउंडेशन चे संस्थापक सदस्य ज्यांनी आजपर्यंत गेली वीस ते बावीस वर्ष समाजासाठी सर्वस्व वाहिले आहे असे सन्माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांनी त्यांचे कामानिमित्त बाहेर गावी जाताना इंदापूर नगरपरिषदेने केलेल्या कामाची दखल घेण्यासाठी वरील ठिकाणी आवर्जून भेटी देऊन माननीय नगराध्यक्ष सौ अंकिता ताई शहा, मुख्यअधिकारी माननीय डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली कामे केलेल्या नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
अटल आनंद घनवन येथे भेटीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की शहरांमध्ये आपण मोठ मोठ्या इमारतीच्या भिंती उभ्या करण्यापेक्षा मोठमोठी झाडे उभी केली पाहिजेत इंदापूर नगर परिषदेने अशाच प्रकारचे शहरात इतर ठिकाणी अशीच घनवने तयार करून जैवविविधता जपली पाहिजे तुमच्या या कार्याचा आदर्श महाराष्ट्रातील इतर नगरपरिषदेने घेऊन त्यांनीसुद्धा असे वने निर्माण केले पाहिजेत.इंदापूर नगरपरिषदेचा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. इंदापूर नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी आपला जीव ओतून अशा प्रकारची कामे केलेली आहेत हे यातून जाणवत आहे असे गौरव उद्गार काढून सर्वांचे अभिनंदन केले.
इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्र येथे आवर्जून भेट दिली त्या दरम्यान त्यांनी तेथील उपक्रम ,विविध प्रकारच्या लावलेल्या आयुर्वेदिक वनस्पती व इतर वनस्पतीची माहिती घेतली कचर्यात आलेल्या टाकाऊ वस्तु पासून त्याचा खुबीने पुनर्वापर केलेल्या वस्तूंची त्यांना भुरळ पडली. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की येथे फिरताना कुठल्याही प्रकारचा दुर्गंधी चा वास आला नाही किंवा माशाचा प्रादुर्भाव जाणवला नाही शहरातील नागरिकांनी येथे आवर्जून भेट द्यावी .
जेणेकरून त्यांनी वेग वेगळ्या केलेल्या कचऱ्याचे येथे काय होते येथील कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करतात याची सुद्धा त्यांना जाणीव होऊन त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. येथील कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की कचरा या क्षेत्रामध्ये काम करणारे खऱ्या अर्थाने देशाचे सैनिक आहेत कारण देशात दोन प्रकारचे सैनिक आहेत एक बॉर्डरवर लढणारा सैनिक तो बाहेरच्यांना आत येऊ देत नाही त्यामुळे आपण आपला देश सुरक्षित आहे.. तर दुसरा सैनिक जो गाव पातळीवर गावात अशा वेगवेगळ्या उपक्रमातील कार्य करत आहेत ज्याच्यामुळे गाव स्वच्छ राहते आणि रोगराई न पसरण्यास मदत होते खऱ्या अर्थाने अशा काम करणाऱ्या सैनिकांना माझा सॅल्यूट. अशाच प्रकारे उत्तरोत्तर आपल्या शहराची अशीच प्रगती होवो आपल्या हातून असेच कार्य घडो आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी संप पंप हाऊस येथील लावलेल्या वृक्षाबद्दल श्री गजानन पुंडे यांनी माहिती दिली आणि आणि या ठिकाणी देव चाफ्याच्या आलेल्या फुलांचा पुष्पगुच्छ नगराध्यक्ष सौ अंकिता ताई यांच्या हस्ते देऊन माननीय डॉक्टर अविनाश पोळ यांना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता ताई शहा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा, नगरसेवक व इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.भरतशेठ शहा आस्थापना प्रमुख श्री.गजानन पुंडे, अल्ताफ पठाण, विलास चव्हाण, शहर समन्वयक शिवराज परमार, सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ व श्री अशोक चिंचकर, दीपक शिंदे हे उपस्थित होते, तत्पूर्वी वरील सर्व उपक्रमाबाबत अल्ताफ पठाण यांनी डॉ.अविनाश पोळ यांना माहिती दिली.
टिप्पण्या