कर्मयोगी शंकरराव पाटील सह.साखर कारखाण्या वर देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
इंदापूर: 26 जानेवारी 2021 रोजी 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यस्थळावर सकाळी 8 वाजता कारखान्याचे आदरणीय चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांचे शुभहस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये व कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून संपन्न झाला.
सदर समारंभास कारखान्याचे सर्व विदयमान संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी मुकादम, ऊस वाहतुक कंञाटदार, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार, सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरक्षा विभागाने परेड करीत झेंडयास मानवंदना दिली व शाळेच्या विदयार्थ्यांनी जन गन मन राष्टगीत सादर करुन हा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या