मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

इंदापूर : केंद्र सरकारने जीएसटी आणि आयकर कायद्यातील जाचक तरतुदी रद्द करून करविषयक तरतुदी सोप्या व सुटसुटीत करण्याची मागणी कर सल्लागार संघटना,इंदापूर आणि इंदापूर व्यापारी संघटने तर्फे करण्यात आली.
देशभरातील कर सल्लागार आणि व्यापारी संघटना यांनी शुक्रवारी(दि.२९) देशव्यापी आंदोलन केले.या अंतर्गत इंदापूर तहसीलदार कार्यालयात शांततेच्या मार्गाने मा.तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देवुन विरोध प्रदर्शन करण्यात आले.
जीएसटी कायद्यात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे वेळच्यावेळी त्याची माहिती होणे व अंमलबजावणी करणे यात अडचणी निर्माण होत असुन सदर आंदोलन हे सरकार विरोधात नसुन कर कायद्यातील सुधारणांबाबत आहे,
असे कर सल्लागार संघटने तर्फे कर सल्लागार अमोल शहा व मयुर गुजर यांनी सांगितले.अनेक कर सल्लागार, सनदी लेखापाल सदर कर कायद्यातील रिटर्न्स मध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे व्यथित झाले असुन हा भार त्यांच्या  सहनशक्तीच्या बाहेर गेला असुन जीएसटी रिटर्न्स मध्ये बिलाप्रमाणे खरेदी,विक्री परिशिष्ट आणि कराचा भरणा पुर्वीसारखेच महिना संपल्यावर एका निर्दिष्ट तारखेला भरावे व तसेच आयकर रिटर्न्स भरण्यासाठीचे फाॅर्म वर्षाच्या सुरूवातीला एकदाच देणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी कर सल्लागार संघटनेकडुन करण्यात आली.
तसेच सर्व व्यापारी,उद्योजक हे आपल्या व्यापार करत असताना त्यामधील खरेदी-विक्री, हिशोब,कर कायदे,विविध पत्रके यांची पूर्तता ऑनलाईन करण्यासंदर्भातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे हैराण झाले आहेत.तसेच कर कायद्यातील जाचक तरतुदीनुसार विविध पूर्तता करताना व्यापारी वर्गाला दमछाक होते,अशी व्यथा व्यापारी संघटनेकडुन नंदकुमार गुजर यांनी मांडली.
चुक झाली तर जीएसटी रिटर्न दुरुस्त करता येत नाही,कर कायद्यात पूर्व सुचना न देता सतत काही ना काही नवीन बदल,फाॅर्म मधील बदल मागील तारखेपासुन केले जात असल्याने त्याचा मागोवा ठेवावा लागत असल्याचे भरत शहा यांनी सांगितले.
आयकर,टीडीएस,जीएसटीची स्वतः दाखल केलेली आणि पुरवठादार व ग्राहक यांनी दाखल केलेल्या माहितीत फरक असेल तर ज्यांनी चुक केलेली आहे,त्यांना नोटीस न देता निरागस खरेदीदार व्यापाऱ्यांना नोटीसा येणे,ई-वे बिल दुरुस्त न होणे,इनपुट टॅक्स क्रेडीट रोखणे,नोंदणी रद्द करणे,कॅश लेजर,क्रेडीट 
लेजर,अव्हेलेबल,युटीलाईज्ड क्रेडीट संकल्पना अजुनही नक्की समजत नाही, व्यापाऱ्यांनी व्यापार करायचा की कर कायद्यातील वरील अशा क्लिष्ट तरतुदींनुसार पूर्तता करायची,याचा व्यापाऱ्यांना त्रास होत आहे.त्यामुळे कर कायद्यात सुसह्य सुधारणा कराव्यात,अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.मा.तहसीलदार मेटकरी यांनी दोन्ही संघटनेचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्वीकारले व हे निवेदन केंद्रीय अर्थ मंत्री कार्यालयात पाठवू तसेच आपल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करु,असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी इंदापूर कर सल्लागार संघटनेतील शिवाजी चवाण, धीरज गांधी,शंकर गायकवाड,संजय राऊत तर व्यापारी संघटनेतील नरेंद्रकुमार गांधी,दत्तात्रय बोत्रे,संजय बानकर,मुकुंद शहा,पृथ्वीराज पाटील,संदीप वाशिंबेकर,धीरज कासार,नितिन शहा,इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...