इंदापूर:
शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याच्या सुरक्षा विभागाने ध्वजवंदना दिली. यावेळी आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासबापू वाघमोडे होते.
भारताने गेल्या 71 वर्षात सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असल्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी भाषणात सांगितले.
प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी केले. यावेळी विलासबापू वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. या ध्वजारोहन कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन कांतीलाल झगडे, दत्तात्रय शिर्के, प्रतापराव पाटील, संजय बोडके, दादासाहेब घोगरे, भागवत गोरे, बबनराव देवकर, नामदेव किरकत, माणिकराव खाडे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधिक्षक सुभाष घोगरे यांनी केले.
_______________________________
टिप्पण्या