इंदापूरः (शिवसृष्टी न्यूज वृत सेवा) : कशिष प्रॉडक्शन्स व पुणेकर प्रतु फाऊंडेशन च्या वतीने तसेच चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स प्रा. लि. च्या सहकार्याने ग्लोबल आयकाॅन्स ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार अप्सरा आली, तुझ्यात जीव रंगला ( वहिनीसाहेब) फेम अभिनेत्री माधुरी पवार यांना जाहीर झाला आहे.
दि. १ फेब्रुवारी रोजी पुणे येथे अण्णाभाऊ साठे सभागृहात ह्या पुरस्कार सोहळयाचे आयाेजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात अभिनेत्री माधुरी पवार यांना बेस्ट अॅक्टर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ह्या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, पोलिस अधिकारी, अभिनेते, दिग्दर्शक, मॉडेल, मेकअप आर्टिस्ट आदींनाही पुरस्कृत करण्यात येणार आहे.
टिप्पण्या